ब्रम्हपुरी, नागभीड, व चिमूर तालुक्यात अनेक कुटूंबांनी आपल्या उदरनिर्वाहास आधार मिळावा यासाठी त्यांनी नवीन रेशनकार्ड तयार केले आहेत. या नवीन रेशनधारकांमध्ये संयुक्त कुटूंबातून विभक्त झालेल्यांचाही समावेश आहे. ब्रम्हपुरी तालुक्यात अंत्योदय रेशनकार्डधारकांची संख्या १०१४६, धान्य वितरण प्रणालीतील प्राधान्य गट कार्डधारक २५३९४ तर नवीन प्रस्तावित ४०३६ असे एकुण ३९५७९ कार्डधारक आहेत. नागभीड तालुक्यात अंत्योदय रेशनकार्डधारकांची संख्या ९३६०, धान्य वितरण प्रणालीतील प्राधान्य गट कार्डधारक १८९७५ तर नवीन प्रस्तावित ३३३७ असे एकुण ३१६७२ कार्डधारक आहेत. तर चिमूर तालुक्यात अंत्योदय रेशनकार्डधारकांची संख्या १०१८२, धान्य वितरण प्रणालीतील प्राधान्य गट कार्डधारक २७२९८ तर नवीन प्रस्तावित ५९६९ असे एकुण ४३४४९ कार्डधारक आहेत.
यापैकी माहे डिसेंबर २०२०च्या आकडेवारीनुसार ब्रम्हपुरी तालुक्यात नवीन शिधापत्रिकाधारक ४०३६, नागभीड ३३३७ तर चिमूर तालुक्यात ५९६९असे एकुण १३ हजार ३४२ शिधापत्रिकाधारक आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रस्तावित नवीन शिधापत्रिकाधारकांना शासनाच्या अन्न धान्य पुरवठा योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे हे प्रस्तावित नवीन शिधापत्रिकाधारक अन्न धान्याच्या लाभापासून वंचित आहेत. परिणामी, या नवीन शिधापत्रिकाधारकाच्या कुटूंबावर उपासमारीची पाळी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच कोरोना महामारीच्या संकटात हातचे रोजगार हिरावल्या गेल्यामुळे त्रस्त असतांना, नवीन रेशनकार्डधारकांना अन्न धान्याची उपलब्धता होत नसल्याने हे प्रस्तावित शिधापत्रिकाधारक अन्न धान्याचा पुरवठा होत नसल्याने चिंतेत आहेत. सदर समस्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अमृत नखाते चिमूर विधानसभा क्षेत्र यांच्या निदर्शनास येताच त्यांनी ब्रम्हपुरी, नागभीड, व चिमूर तालुक्यातील प्रस्तावित नवीन शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून त्वरीत अन्नधान्याचा पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, अन्न नागरी व पुरवठा मंत्री नाम. छगनजी भुजबळ व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे उपविभागीय अधिकारी, ब्रम्हपुरी यांच्या मार्फत निवेदन प्रेषित केले, व समस्या तात्काळ मार्गी लावण्याची मागणी उपविभागीय अधिकारी संदिप भस्के यांना केली.
सदर निवेदन देतेवेळी केवळराम पारधी उपतालुका प्रमुख शिवसेना ब्रम्हपुरी, डॉ.रामेश्वर राखडे उपतालुका प्रमुख शिवसेना ब्रम्हपुरी, शामराव भानारकर माजी शहरप्रमुख, गुलाब बागडे विभागप्रमुख, मोरेश्वर अलोने विभागप्रमुख, रामचंद्र मैंद विभागप्रमुख, गणेश बागडे, विक्की मडकाम माजी शहरप्रमुख नागभीड, मनोज लडके उपतालुका प्रमुख नागभीड, बंडू पांडव उपतालुका प्रमुख नागभीड, श्रीहरी सातपुते तालुका प्रमुख चिमूर, भाऊराव ठोंबरे विधानसभा समन्वयक, सुधाकर दिवटे उपतालुका प्रमुख आदी. शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.