तालुक्यात वाघाचे मानवावरील हल्ले थांबता थांबेना. तालुक्यातील अमिर्झा-आंबेटोला मार्गावरील जंगल परिसरात वाघाने हल्ला करून महिलेला गंभीर जखमी केल्याची घटना दुपारी २ ते २:३० वाजताच्या सुमारास घडली.
मंगला प्रभाकर कोहपरे (५० ) रा. आंबेटोला जि.गडचिरोली असे जखमी महिलेचे नाव आहे.
वारंवार मानवावरील घटना वाढत असल्याने परिसरातील नागरिक दहशतीत असून वनालगत असलेल्या शेतकऱ्यांनी शेती करावी कशी ? असा प्रश्न उपस्थित होत असून वनविभागाप्रती तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.