वाशिम : कारंजा नगरीचे भूमिपुत्र असलेले व वर्तमानात पुणे येथून साप्ताहिक करंजमहात्म्य वृत्तपत्राची यशस्वी पत्रकारीता करणारे, पुण्याला वास्तव असणारे संतोष उर्फ बालूभाऊ झेलकर यांनी पत्रकारीता क्षेत्र व सामाजिक क्षेत्रात भरीव कामगीरी केलेली आहे. ते कारंजा येथील महाराणा प्रताप व्यायाम शाळेचे सभासद असून त्यांनी बरेच वर्ष के-न्यूज (कारंजा -चॅनलला) पत्रकारीता केली आहे. सध्या पुणे येथे त्यांचा बराच परिचय असून तेथील सामाजिक व आरोग्यदायी कार्यात ते सेवाव्रती कार्य करीत आहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड,महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी वैदर्भिय नाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या सामाजिक विभागाच्या वतीने, "महाराष्ट्र-भूषण" ह्या राज्यस्तरीय पुरस्काराकरीता करण्यात आली आहे. दि २३ फेब्रुवारी रोजी त्यांना सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून,वैदर्भीय नाथ चॅरिटेबल ट्रस्टद्वारा, महेश भवन कारंजा येथे दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी,सन्माननिय मंत्री महोदय तथा जिल्ह्यातील आमदाराच्या उपस्थितीत आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये, संतोष उर्फ बालूभाऊ झेलकर यांना आकर्षक सन्मान चिन्ह, मेडल,दुपट्टा,सन्मानपत्र, मानाचा फेटा,व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे,त्याबद्दल संतोष उर्फ बालूभाऊ झेलकर यांचे विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे, उपाध्यक्ष उमेश अनासाने, माजी नगराध्यक्ष संजय काकडे, पत्रकार महेंद्र गुप्ता यांनी अभिनंदन केले असून, त्यांच्यावर विविध क्षेत्रातून सुद्धा अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे,