कारंजा (लाड) : स्थानिक जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ कारंजा आणि विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा द्वारा सालबाद प्रमाणे यंदाही दिव्यांग वारकरी दिंडी दि. 15 जून 2024 रोजी श्रीक्षेत्र कारंजा (लाड) येथून श्रीक्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल रखुमाई दर्शन) आणि श्रीक्षेत्र तुळजापूर (महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई अंबाबाईच्या दर्शन) करीता रवाना होणार आहे.असे वृत्त जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळ कारंजाचे दिंडीप्रमुख तथा विदर्भ लोककलावंत संघटना कारंजाचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.सदरहु वारीमध्ये महाराष्ट्रातील शेतकरी राजाच्या सुख समाधानाकरीता आणि तिर्थक्षेत्र कारंजा नगरीच्या विकासाकरीता पांडूरंगाला साकडं घालण्यात येणार आहे.याशिवाय दिंडीतील वारकरी वृक्षारोपन, लेक वाचवा-लेक शिकवा, इत्यादी कार्यक्रमा सोबत व्यसनमुक्ती करीता जागर करणार आहेत.असे वृत्त दिंडीतील सहभागी वारकरी संजय कडोळे,प्रदिप वानखडे, उमेश अनासाने,हभप माणिक महाराज हांडे,हभप अजाब महाराज ढळे, गोपाल मुदगल, सुधाकर इंगोले,कांताबाई लोखंडे, इंदिराबाई मात्रे आदींनी कळवीले आहे.