कारंजा : कारंजा येथील शासकीय उप जिल्हा रुग्नालयातील कार्यरत वैद्यकीय अधिकारी म्हणजेच डॉक्टर्स मंडळी ही स्वतःची खाजगी रुग्नालये नियमबाह्य पद्धतीने चालवीत असून स्वतःच्या ड्युटीमध्ये आलेल्या रुग्नांवर शासकिय रुग्नालयात उपचार न करता, स्वतःच्या खाजगी इस्पितळात बोलवून रुग्नाची दिशाभूल करतात.व खाजगी उपचाराचे नावाखाली रुग्नांची मानसिक व आर्थिक फसवणूक करीत असल्याच्या तक्रारीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव कपिल महाजन यांनी वरिष्ठांकडे लेखी तक्रारी देऊन संबाधित वैद्यकिय अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. तसेच वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी संबधित अधिकार्यावर कठोर कारवाई करीत गोरगरीब लाचार रुग्नांना न्याय मिळवून देण्याची मागणी केलेली आहे. असे वृत्त तक्रारकर्ते मनसे कारंजा शहर सचिव कपिल महाजन यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळवीले आहे.