कारंजा (लाड) : वैशाखाच्या चालू महिन्यात,पश्चिम विदर्भात तापमानाच्या पाऱ्याने उच्चांक गाठल्यामुळे सशक्त माणसाच्या अंगाचीच लाही-लाही होत आहे. विशेष करून आधीच आजारी असलेले रुग्न,वयोवृद्ध,गरोदर महिला,लहान मुले यांना उन्हाळ्याचा जास्त त्रास होऊन त्यांच्यामध्ये घबराहट होणे, वारंवार तहान लागून जीव कासावीस होणे,अशक्तपणा वाटल्यासारखे होणे असे प्रकार होऊ शकतात.तसेच ताप,पातळ शौचास होणे,वारंवार शौचास जाणे,मळमळणे इत्यादीच्या रुग्नात वाढ होते.त्यामुळे अशावेळी रुग्नांनी लगेचच आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.किंवा जवळच्या प्राथमिक रुग्नालय वा उपजिल्हा रुग्नालयात दाखल व्हावे.तसेच रक्तदाब व मधुमेह असणाऱ्या रुग्नांनी विशेष काळजी घेऊन आपल्या आहार विहाराकडे लक्ष्य देण्याचे आवाहन साप्ताहिक करंजमहात्म्य परिवाराचे हितचिंतक - समर क्लिनिकचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.मुजफ्फर खान यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भाचे उपाध्यक्ष संजय कडोळे यांचेशी बोलतांना त्यांनी सांगीतले की, यंदाचा उन्हाळा,पर्यावरणातील बदल आणि वातावरणातील प्रदुषण लक्षात घेता नागरीकांनी १) सकाळी १०:०० ते ०५ :०० या वेळेत (भर उन्हात) बाहेर जाणे टाळावे.२) बांधकाम मजूर किंवा शेतमजूरी करणाऱ्यांनी शक्यतो आपली कामे सकाळी १०:०० पूर्वी व रात्रपाळी मध्ये करावी.३) साधारणतः अर्ध्या अर्ध्या तासाने पाणी प्यावे.४) घराबाहेर पडतांना पिण्याच्या पाण्याची बाटली सोबत ठेवावी. ५) पांढरे व ढिले सुती (कॉटनचेच) कपडे घालावेत. ६) एसी किंवा कुलरमधून लगेच उन्हामध्ये बाहेर पडू नये.७) उन्हाळ्याचे दिवसात उपवाशी राहू नये.हलके जेवण करूनच कामे उरकवावीत.८) उन्हातून आल्याबरोबरच थंड पाण्याने आंघोळ किंवा हातपाय धुवू नये व लगेचच थंड पाणी पिऊ नये. ९)बाजारात मिळणारी कोल्ड्रिंक्स पिऊ नये त्याऐवजी ओ.आर .एस.(लिक्वीड) ताक,मठ्ठा,ऊसाचा रस,लिंबू शरबत,नारळपाणी,फळांचे ज्युस घ्यावेत.१०) उष्माघात (ऊन) लागल्यास वेळ न दवडता त्वरीत आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच १) सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५ : ०० पर्यंत उन्हामध्ये फिरू नये. २) उन्हात चालणारी इमारत बांधकाम,रस्ते बांधकाम, शेतातील कामे व मेहनतीची जड कामे करू नये. २) मद्यपान किंवा तंबाखू गुटखा नशीली पदार्थाचे सेवन आणि तेलकट, मसालेदार, हॉटेलचे व उघड्यावरचे पदार्थ आणि मांसाहारी पदार्थाचे सेवन करू नये.उष्माघाताचा त्रास जाणवताच जवळच्या जिल्हा उप रूग्नालयात वा प्राथमिक आरोग्य केन्द्रात दाखल व्हावे.असे आवाहन आदर्श समाजसेवी डॉ.मुजफ्फर खान यांनी केले असल्याचे संजय कडोळे यांनी कळवीले आहे.