राजकिय पक्ष आणि त्यांचे उमेद्वार आपल्या प्रचार प्रसाराकरीता वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघातील प्रत्येक तालुका व शहरातील स्थानिक साप्ताहिक वृत्तपत्रे आणि लघुपत्रकार यांची त्यांच्या प्रचार प्रसारा करीता मदत घेणार असतील आणि त्यांच्या प्रचारार्थ जाहिराती देणार असतील तर आणि तरच त्यांच्या बातम्यांना प्रसिद्धी देण्याचा निर्णय वाशिम जिल्हयातील महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेने घेतला असल्याचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे. अन्यथा "जाहिरात नसेल तर बातम्यांना प्रसिद्धी नाही." असे धोरण अंगीकारण्याचे महाराष्ट्र राज्यस्तरीय पत्रकार परिषदेने ठरविल्याचे त्यांनी कळवीले आहे.