कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे)- दिनांक २५ जून रोजी कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आ.मा. राजेंद्र पाटणी यांनी कारंजा येथे तालुका क्रीडा संकुल येथील शिवकालीन युद्ध कला शौर्य प्रशिक्षण शिबिरास भेट दिली असून उपस्थित प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी व व्यासपीठावरील मान्यवरांना मार्गदर्शन करून येथील आयोजक व प्रशिक्षकांचे कौतुक केले.अशा शिबिराची आवश्यकता यावेळी बोलताना आमदार राजेंद्र पाटणी यांनी विषद केली.कारंजा येथे सौ प्राजक्ता उमेश माहितकर यांच्या संकल्पनेतून व मैजिक टच स्पा यांच्या सहकार्याने दिनांक 16 जून ते 30 जून पर्यंतचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी नगरसेविका प्राजक्ता माहीतकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी सांगितले, "छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त या शिबिराचे मुख्यत्वेकरुन महिलांकरिता,युवती करिता,शालेय विद्यार्थिनींकरिता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. " प्रशिक्षण शिबिर स्थळी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षणार्थ्यांनी यावेळी प्रात्यक्षिक सादर केले. उपस्थित मान्यवरांनी सादर प्रात्यक्षिक पाहून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमात व्यासपीठावर आमदार राजेंद्र पाटणी साहेब, भाजपा तालुका अध्यक्ष डॉ. राजीव काळे, शहर अध्यक्ष ललित चांडक,शशी नांदगावकर, सौ.प्राजक्ता माहितकर होते. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रा.सुनील काळे,अमोल गढवाले,अर्चनाताई गोमासे, राजू भाऊ मते, गावंडे सर, रोकडे दर्शन, प्रीतम सोनोने, शारदाताई बांडे, सविताताई काळे, शुभांगीताई पिंपळे, राहुल रविराव, नीताताई पापळकर, शशी वेळूकर, सविज जगताप, शुभम बोनके, दिनेश वाडेकर, सुरेश गिरमकार, रवीभाऊ शहाकार, भीमराव कोळकर इत्यादिसह अन्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन गावंडे सर यांनी केले. असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांचेकडे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात,भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहाय्यक संजय भेंडे यांनी कळविले आहे.