अकोट - प्रतिभा साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य - अकोट तालुका कार्यकारिणीच्या वतीने दि.२३ सप्टेंबर २०२४ रोजी "उत्सव पिकपाण्याच्या कवितांचा " या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी कविता व कथांची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेसाठी शेतीमाती, शेतकरी ,पिकपाणी,निसर्ग इत्यादी विषयांवर आधारित कविता आणि कथा पाठवायचे आवाहन करण्यात येत आहे.
साहित्यिकांनी आपले साहित्य दिनांक २० ऑगस्ट २०२४ पर्यंत विशाल कुलट तालुका अध्यक्ष यांच्या भ्रमणध्वनी ७४४८१३९९५७ किंवा सागर तळोकार, सचिव यांच्या भ्रमणध्वनी ९४०४८७१४६८ यांच्या व्हाट्सअप किंवा vishalkulat12@gmail.com किंवा sagartalokar85@gmail.com या ईमेल वर पाठवावे. प्राप्त कवितां व कथां मधून प्रत्येकी तीन पुरस्कार तसेच उत्तेजनार्थ दोन पुरस्कार राहतील.रोख रक्कम,स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून अकोट येथे संपन्न होणाऱ्या "उत्सव पिकपाण्याच्या कवितांचा" या कार्यक्रमात दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी मान्यवरांचे हस्ते देण्यात येतील.स्पर्धेचा निकाल वृत्तपत्रांमधून जाहिर झाल्यानंतर पुरस्कार प्राप्त स्पर्धकांना कार्यक्रमास निमंत्रित करण्यात येईल.
तरी या राज्यस्तरीय साहित्य स्पर्धेसाठी कविता व कथा पाठवायचे आवाहन प्रतिभा साहित्य संघ, महाराष्ट्र राज्य, अकोट तालुका कार्यकारिणीच्या वतीने करण्यात आले आहे...