या घटनेनंतर स्थानिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले. पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.
पालघर नजीकच्या चिल्हार बोईसर मार्गावर भरधाव ट्रेलरने शाळकरी विद्यार्थ्यांना चिरडल्याची घटना आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारास घडली. या घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. घटनेतली अन्य दाेघा जखमी विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या अपघाताबाबत घटनास्थळावरुन आणि पाेलिसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी : चिल्हार बोईसर मार्गावरुन एक ट्रेलर भरधाव आला. या ट्रेलरची शालेय विद्यार्थ्यांना धडक बसली. त्यावेळी विद्यार्थी जाेरात किंचाळले. विद्यार्थ्यांचा आवाज येताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेत एका विद्यार्थ्याचा जागेवरच मृत्यू झाला. पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार मृत विद्यार्थी हा आठवीत शिकत हाेता. निखिल काळुराम गिरहाने असे त्याचे नाव असून ताे पालघर येथील चरी येथे वास्तव्यास हाेता. घटनेतील दाेघा गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.