वाशिम : पर्यावरणाच्या अचानक बदलामुळे तापमानात अचानक वाढ होऊन विदर्भात तापमानाचा पारा 40 ते 45 अंश सेल्सियस पेक्षा जास्त असून,ब्रम्हपूरी, चंद्रपूर,अकोला,कारंजा (लाड) ही शहरे प्रचंड तापलेली आहेत. उकाडा वाढलेला असून,शरिरात उष्णतेमुळे दाह होत आहे. अक्षरशः जनजीवन त्रस्त झाले आहे.भयंकर उन्हामुळे सकाळ होताच 08:30 नंतर उन्हाचा पारा वाढायला लागतो.एकीकडे शहरातील रस्ते निर्मनुष्य होतांना दिसत आहेत.तर दुसरीकडे पावसाळा जवळ येत असल्याने बि बियाणे खताच्या खरेदी करीता बाजारपेठेत खरेदीला येणारे शेतकरी यांचे प्रचंड हाल होतांना दिसत आहेत.त्यातच हवामानातील बदलामुळे डेंग्यु,मलेरिया, टायफाईड,ताप,सर्दी,खोकला, गालफुगी,काजण्या,सारखे आजार वाढल्याने रुग्नालयात मात्र रुग्नांची गर्दी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांच्या घशाला कोरड पडणे,श्वास भरून येणे किंवा दम लागणे,चक्कर येणे.डोके दुखणे असे प्रकार घडत असल्याने ते पिण्याच्या पाण्याकरीता बिसलेरी बॉटल, ऊसाचा रस,लस्सी,थंडपेय व टरबूज खरबूज इ.फळाची मागणी करतांना दिसत आहेत. या पार्श्वभूमिवर आरोग्य विषयक जनजागृती करतांना दिव्यांग समाजसेवक संजय कडोळे यांनी नागरिकांना आवाहन करतांना म्हटले आहे की, चालू आठवड्यात दि. 07 जून 2024 पर्यंत उष्णतेचा प्रकोप कायम राहणार असून नागरीकांनी भयंकर उन्हामध्ये बाहेर फिरणे टाळले पाहिजे.त्याऐवजी आपली बाहेरची कामे सकाळी किंवा सायंकाळी उरकून घ्यावी. उन्हाळ्या मध्ये सैल अशा सुती कापडाचा वापर करावा.उपाशी पोटी फिरूच नये.डोक्याला उपरणे किंवा रुमाल व डोळ्याकरीता गॉगल वापरावा. उन्हापासून बचाव करण्यासाठी एखादा कांदा व भिमसेनी कापूर जवळ ठेवून त्याचा वास घ्यावा. उन्हातून आल्याबरोबर हळू हळू पाणी प्यावे. फ्रिजरचे व बिसलेरीचे पाणी पिण्यापेक्षा मातीच्या माठामधील पाणी घ्यावे. उन्हामध्ये अतिथंड पेय,टरबूज, खरबूज खाऊन लगेच उन्हात जाऊ नये.आरोग्याविषयी तक्रार असल्यास कोणत्याही गोळ्या औषधे स्वतःच्या मनाने घेऊय नये.लगेच रुग्नालयात जाऊन,डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधोपचार घ्यावा.असे आवाहन त्यांनी केले आहे.