ऐक तरुणा भाई ....!
हात जोडुनी पडतो मी पाया
कधीच नको तंबाखू, खर्रा
जीवन जाईल तुझं वाया !
दारु पिणाऱ्याला म्हणता तळिराम
त्याचा सगळा थाटच महान
तंबाखू खाणाऱ्याला म्हणावं मळिराम
त्याचा फक्त कार्यक्रमच लहान ।।
तरुणांत व्यसनाचं फॕशन जडलं
मुल नसल्याच दुःख घडलं
व्यसनान नपुसकत्व, वंधत्व आलं
व्यसन सोडण्याचं शहाणपण आलं !
निकोटिनच विष तंबाखूत दडलयं
कर्करोग, अस्थमा झाल्यावर कळतं
झोप, भूकेच रहस्य नडलयं
व्यसनाचा नादात कसं नाही कळतं !
तंबाखू, गुटखा, खर्रा घेऊन
जावे लागेल मृत्यूच्या गांवा
वेळीच दक्षता घेऊन
व्यसनमुक्ती करु या भावा !
तंबाखू, खर्राचं जाणून दुष्परिणाम
रक्तवाहिन्यास इजा होऊन होतयं गँगरीन
हाड ठिसूळ होऊन अस्थिभंग परिणाम
सुरकुत्या पडून अकाली म्हातारपण !
खरचं तंबाखू, खर्रा सोडा
आयुष्याची नवीन पहाट पाहू या
जनकल्याणा वृत्ती जोडा
वर्तमान आनंदानं जगू या !
कवि
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....