कारंजा-येथून जवळच असलेल्या ग्राम यावर्डी येेथिल बाबासाहेब धाबेकर विद्यालयात दिनांक 02 नोव्हबर 2023 रोजी दुपारी 12:00 वाजता विद्यालयाच्या प्रांगनात प्राथमिक आरोग्य केंद्र मनभा अंतर्गत उपकेंद्र लोणी अरब द्वारा सद्या सुरु असलेल्या सर्दी,खोकला,ताप, डेंगू,मलेरिया याबाबत व गोल्डन कार्ड बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्र मनभा अंतर्गत उपकेंद्र लोणी अरब व्दारा श्री बाबासाहेब धाबेकार विद्यालय यावर्डी येथिल विद्यार्थ्यांना साथ रोग बाबत मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक विजय भड यांच्या उपस्थित करण्यात आली.यावेळी उपकेंद्र लोणी अरब येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अभिलाषा लकडे यांचे मार्गदर्शनात आरोग्य सेवक देवेंद्र बाजीराव चंद्रशेखर यांनी साथ रोग विषयी मार्गदर्शन करतांना डेंगू डासाच्या 4 अवस्था, त्यांचे नाव,डेंगू रोगाचा प्रतिबंध,शनिवार कोरडा दिवस,सर्दी खोकला झाल्यावर घ्यायची काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तर आरोग्य सेविका वैशाली सुरेश जावतकर यांनी गोल्डन कार्ड चा कैम्प 10 नोव्हबर रोजी घेण्यात येईल त्यावेळी विद्यार्थ्यांनी सोबत क़ाय क़ाय आनावे,गोल्डन कार्डचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक व संचलन गोपाल काकड तर आभार अनिल हजारे यानी मानले,यावेळी शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्म. व विद्यार्थी उपस्थित होते.