कारंजा/वाशिम : भटक्या विमुक्त बंजारा समाजाविषयी सदैव आस्था ठेवणारे,अमरावती विधान परिषद मतदार संघाचे सदस्य असलेले,(अपक्ष) कर्तव्यदक्ष शिक्षक आमदार अँड किरणरावजी सरनाईक यांनी,पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर,विधानपरिषदेत लक्ष्यवेधी मांडून, "वाशिम येथील मंजूर झालेल्या,जिल्हा शासकिय महाविद्यालयाला,विश्वातील बंजारा समाजाचे आद्यधर्मगुरू जगद्गुरु "संत - सेवालाल महाराज" यांचे नाव देऊन, भारतातील एकमेव असे बंजारा धर्मपिठ असलेल्या श्रीक्षेत्र पोहरादेवी हे शक्तिस्थळ असणाऱ्या जिल्ह्याचा,विकासाबाबत अद्यापही मागास व आकांक्षित असलेल्या वाशिम जिल्ह्याचा गौरव वाढविण्याची मागणी रेटून धरीत त्यावर प्राधान्याने विधान परिषदेत चर्चा घडवून आणली." तसेच या विषयी विधानपरिषदेत सविस्तर भाष्य केले.त्याबद्दल कारंजा येथे त्यांच्या या मागणीचे स्वागत करण्यात येत असून, सर्वांनी आपला पाठींबा व्यक्त करीत आम्ही आ.किरणराव सरनाईक यांच्या प्रस्तावाशी सहमत असल्याचे म्हटले आहे.स्थानिक विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा,ईरो फिल्मस् कारंजा,जय भारत आदर्श संस्था,कारंजा तालुका भटक्या विमुक्त जाती जमाती संघ कारंजा,महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषद वाशिम कारंजा या संस्थानी लोकप्रिय शिक्षक आमदार अँड. किरणराव सरनाईक यांचे अभिनंदन केले असून,त्यांचे आभार मानले आहे.अभिनंदन कर्त्यामध्ये असलेले,कारंजा तालुका भटक्या विमुक्त संघाचे सचिव तथा विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे म्हणाले की, "आता कोणताही विलंब न लावता मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे,उपमुख्यमंत्री ना. देवेन्द्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी वाशिम जिल्हयातील, जगदगुरू संत सेवालाल महाराज जिल्हा शासकिय वैद्यकीय . महाविद्यालय वाशिमच्या नावाची घोषणा करावी.आणि वाशिम जिल्ह्यातील समस्त नागरिकांना दिलासा द्यावा." विदर्भ लोककलावंत संघटनेचे प्रदिप वानखडे.ईरो फिल्मसचे डॉ इम्तियाज लुलानिया,रोमिल लाठीया,जय भारत आदर्श संस्था कारंजाचे डॉ ज्ञानेश्वर गरड, मराठी नाटय परिषदेचे नंदकिशोर कव्हळकर,उमेश अनासाने इत्यांदीनी, विधानपरिषदेत लक्ष्यवेधी मांडून त्याचा व्यवस्थित अभ्यासपूर्ण पाठपुरावा केल्याबद्दल अँड किरणराव सरनाईक यांचे अभिनंदन करीत, आभार मानले आहे.