रिसोड : शहरातील इंदिरानगर भागातील नागरीकांनी विकत घेतलेल्या एन.ए. लेआऊट मधील दोन ठिकाणच्या नकाश्यानुसार अधिकृत असलेल्य रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे नागरीक तेथे आपल्या प्लॉटचे बांधकाम करु शकत नाही. त्यामुळे या भागातील रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यासंबंधी प्रशासकीय स्तरावर कार्यवाही करावी अशी मागणी रिसोड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा साप्ताहीक पिंगलाक्षी एक्सप्रेचे संपादक गजानन बानोरे यांनी १५ एप्रिल रोजी जिल्हाधीकारी यांच्यासह मुख्याधिकारी न.प. रिसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक, वाशिम, तहसीलदार रिसोड, यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात नमुद केले आहे की रिसोड येथील श्रीमती इंदीराबाई पांडे यांच्या मालकीचे इंदिरानगर ले-आऊट चे एन.ए. १९६१ ला झाले आहे. सदर ले आऊट मध्ये जाण्यासाठी नकाशामध्ये पुर्वेस सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या जवळुन ३०फुटाच रस्ता दर्शवीलेला आहे. तसेच जिरवणकर यांच्या किराणा दुकानाच्या मागुन १५ फुटाचा रस्ता दर्शवीलेला आहे. परंतु या दोन्ही रस्त्यावर अतिक्रमण झाल्यामुळे या ले-आऊट मधील प्लॉट धारकांना रस्ता उपलब्द नसल्यामुळे ते आपल्या प्लॉटचे बांधकाम करु शकत नाहीत. तरी याबाबत जिल्हाधिकारी व संबंधीत अधिकार्यांनी दखल घेऊन सदर ले-आऊट मधील रस्त्यावर झालेले अतिक्रमण काढण्यासंबंधी कार्यवाही करावी तसेच या आगोदर सुद्धा दि. ११ मार्च २०२२ व १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सुद्धा या संदर्भात संबंधीत अधिकार्यांना निवेदन दिले होते.
रिसोड शहरात शासकीय जागेवर व खाजगी जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असुन प्लॉट धारक आपल्या प्लॉटवरील झालेले अतिक्रमण काढण्यासाठी गेले असता अनेक ठिकाणी वाद झाले व अतिक्रमण धारकांनी संबंधीत प्लॉट मालकाकडून खंडणी वसुली केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अतिक्रमण धारकांचे मनोबल वाढत असुन अतिक्रमणावरुन शहरात नेहमीच वाद होतात या वादाचे रुपांतर एखाद्या मोठ्या घटनेत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील अतिक्रमणाबाबत मागील काही महिण्यापुर्वी रिसोड व्यापारी महासंघाने सुद्धा जिल्हाधीकारी यांना निवेदन देऊन शहरातील अवैध झालेल्या अतिक्रमणाबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.