कारंजा : कारंजा शहरातील स्टीट लाईट पोल काल झालेल्या पहिल्या पावसात रस्त्यावर पडल्याने कामाचां दर्जा जगजाहीर झाला आहे त्यामुळे अशा बेजबाबदार नगर परिषद मुख्याधिकारी आणि बाधकाम अभियंता यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी.वाशिम जिल्ह्यातील कारंजा पोलीस स्टेशन मध्ये काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करून गुन्हे नोद विण्याची काँग्रेस पदाधिकारी ने मागणी केली आहे . कारंजा शहरात विकास कामाचे ढोल वाजवत स्वतःची पाठ थापवित स्थानिक नेत्यांनी प्रचंड गाजावाजा केला होता मात्र पहिल्याच पावसात कारंजा बायपास आणि. मेण रोड वरील खांब पडल्याने गाजावाजा आणि श्रेय लटनाऱ्या नेत्यांनी आवाज उठविला नाही त्यामुळे या कामातील अनियमितता उजागर होऊन कमिषणखोरी समोर आली आहे .त्यात या प्रश्नावर स्थानिक काँग्रेस पदाधिकारी यांनी प्रदेश चिटणीस देवानंद पवार याचे सह शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिल्याने शहरात पोल बसविणाऱ्या कापणी आणि नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या भष्टचाराची एकच चर्चा होत असल्याचे दिसत आहे या तक्रार अर्जावर प्रदेश सचिव दिलीप भोजराज ,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष ॲड.निलेश कांनकिरड, ऍड.वैभव ढगे, ऍड.लाहोटी, विजय देशमुख यांचेसह काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत