आरमोरी नगरपरिषद होऊन आत्ता चार वर्षे पूर्ण होत असले तरी पण पिण्याच्या पाणी पुरवठ्यात काहीच सुधारणा झालेली नाही शहरातील लोकांना नेहमी पाणी टंचाईचा सामना करावा लागतो निवडणुकांमध्ये मोठमोठ्याने घोषणा करीत सत्ता आल्यास आपण एका वर्षात नवीन पाणीपुरवठा आणू आणि प्रत्येक घरी नळ देऊ अशी आश्वासने देऊन सत्ता हस्तगत करणारे आता मात्र महिन्यातून आठ ते दहा दिवसच पाणीपुरवठा करीत आहेत. माणसाला अन्न, वस्त्र, निवाऱ्यासोबत सर्वाधिक गरज पाण्याची असते, मात्र प्रगतशील समजल्या जाणाऱ्या आरमोरी शहरात मागील अनेक वर्षापासून नागरिकांना पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागत आहे एखाद्या अतिदुर्गम भागात नसेल त्याहून अधिक बिकट जल समस्या आरमोरी शहरात भेडसावत आहे. आरमोरी शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून एकोणवीस लाख लिटर पाण्याची गरज असताना प्रत्यक्ष निम्म्यापेक्षा कमी म्हणजे सात लाख लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. हा पाणीपुरवठा पुरेसा नसल्याने अनेक भागातील नागरिक त्रस्त आहेत निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासने आतापर्यंत तरी फोलच ठरली आहेत. नगरपरिषद पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन ही जुनी झाली असल्याने नेहमी फुटत असते, आणि वेळेवर ती दुरुस्त करीत नसल्याने वारंवार पाणीपुरवठा खंडित होत असल्यामुळे . पाणीपुरवठा होत नाही असा वारंवार खंडित पाणीपुरवठा वर आळा बसला नाही तर काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा काँग्रेस च्या शिष्ट मंडळानी नगरसेवकांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा नगरसेवक मिलिंद खोब्रागडे शहराध्यक्ष शालिक पत्रे, विजय सुपारे, नगरसेविका उषाताई बारसागडे, नगरसेविका निर्मलाताई किरमे, नगरसेविका दुर्गाताई लोणारे, युवक अध्यक्ष अंकुश गाढवे, संजय लोणारे,सुरज भोयर, रुपेश जंवजाळकर, मनोज बोरकर, विद्या सपाटे, सोमा नैताम,संध्या फुकटकर इंदिरा अवचट, सुशीला दहिकार, दर्शना चीजघरे, शेवंता मोहोळकर भीमराव बारसागडे इत्यादी उपस्थित होते