अकोला:- श्री संताजी इंग्लिश प्रायमरी स्कूल येथे "प्रजासत्ताक दिन" मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष स्थान श्री. श्रीधरजी सखारामजी वानखडे यांनी ग्रहण केले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मा. श्री रामदासजी दत्तूजी नांदुरकर (ऑल इंडिया सेक्रेटरी), मा. श्री ज्ञानदेवजी हरिभाऊजी वानखडे,मा. श्री गिरीजी कुलकर्णी (हिंदू जनजागृती समिती) यांनी स्थान भूषविले होते. द्वीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण हे शाळेचे सर्वेसर्वा मा. श्री मंगेश जी श्रीधरराव वानखडे तसेच मा. श्री विठ्ठल राव रामदासजी नांदुरकर सर या सोबतच प्रमुख पाहुण्याचा सुद्धा सहभाग होता.
कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी भाषण दिले, देशपरागीते म्हटले, वेशभूषा करण्यात आल्या. भाषणामध्ये मा. श्री गिरीश जी कुलकर्णी सरांनी विद्यार्थ्यांना भारताचा इतिहास सांगून विद्यार्थ्यांना भारतीय स्वतंत्राविषयी जनजागृत केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका कु. ज्योती फंडाट तसेच सौ. अश्विनी कुटाफडे (खोत) मॅडम व सर्व शिक्षक, शिक्षकेतर आचार्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम सुरळीत पार पाडला.