गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा पदभार सध्या प्रभारी अधिकार्याकडे आहे. या जिल्ह्यातील पालकमंत्री पद सध्याचे मा.मुख्यमंत्री यांच्याकडे होता तसेच सध्याचे उपमुख्यमंत्री हे या जिल्ह्यातील पालकमंत्री असुनही या जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा तिढा सुटेना. या जिल्ह्यात भाजपाचे खासदार मा.अशोकभाऊ नेते व दोन आमदार ते सुद्धा भाजपाचे तसेच गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.डॉ.देवराव होळी स्वतः डॉक्टर असून सुद्धा याकडे दुर्लक्ष का?
आणि विरोधी पक्षाचे आमदार असलेले मा.धर्मरावबाबा आत्राम व स्वतः डॉक्टर तसेच गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवा दिलेले माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी सुद्धा गप्प का? असा संभ्रम मनात निर्माण झाला आहे.