पांडुरंग हरी आश्रम, तोंगलाबाद ता. दर्यापूर जि. अमरावती येथे स्व. ओंकारराव जाधव व स्व. इंदिराबाई जाधव यांच्या तृतिय पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त वं. राष्ट्रसंताचे आध्यात्मिक विचाराचा प्रचार देशोन्नती पेपर मधून प्रसिद्ध होतात. तसेच साहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल श्री पुरुषोत्तम बैसकार मोझरकर, श्री गुरुदेव प्रचारक यवतमाळ यांचा शाल व मालार्पण करुन विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. त्यांचे आध्यात्मिक लेख श्री गुरुदेव मासिक गुरुकुंज मोझरी यामध्ये प्रकाशित होत असतात. याआधी त्यांना माणिक रत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे.