कारंजा (लाड) : प्राचिन तिर्थक्षेत्र असलेल्या, प्रति पंढरपूर कारंजा नगरीतील सर्व विठ्ठल मंदिर आणि पांडूरंगाचे अवतार असलेल्या संत गजानन महाराज मंदिरामध्ये तसेच श्री नृसिह सरस्वती स्वामी संस्थान (श्री गुरु मंदिर) इत्यादी सर्व मंदिरे हे आषाढी एकादशी निमित्ताने, भाविकांकरीता सज्ज झालेली असून, त्या मंदिरावर विद्युत रोषनाई करण्यात आलेली असून, उद्या सकाळ पासूनच दुग्धाभिषेक,भजन, किर्तन, प्रवचन आदी कार्यक्रम होणार आहेत. त्यामुळे उद्या प्रत्येक मंदिरामध्ये भाविक वारकर्याची मांदियाळी बघायला मिळणार असून, " मायबापा ! विठठला !! पांडूरंगा !!! यंदाच्या हंगामात चांगला पाऊस येऊन भरपूर धन धान्य पिकू देतं." असे आर्त साकडं पांडूरंगाला घालणार आहेत.कारंजा शहरामध्ये कुंभारपूरा येथे जुने विठ्ठल मंदिर, नागोबा बोकोबा गजानन महाराज मंदिरातील विठ्ठल मंदिर, पहाडपूरा येथील साबू यांच्या वाड्यातील विठ्ठल मंदिर, शिवाजीनगर येथील श्री हनुमान मंदिरातील विठ्ठल मंदिर व टेलिफोन कॉलनी,पर्यटन केन्द्रासमोरील विठ्ठल मंदिर ही प्रमुख विठ्ठल रुक्मिणी मंदिरे असून याशिवाय शहरातील प्रत्येक मोहल्ले व नविन वसाहतींमध्ये मायबाप पांडूरंगाचा अवतार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रम्हांड नायक संत गजानन महाराजांची अनेक मंदिरं आहेत.व ह्या सर्वच मंदिरांमध्ये उद्या भाविकांची यात्रा अनुभवायला मिळणार आहे.