अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे १२ जून २०२२ रोजी खुले नाट्यगृह येथे आयोजित "स्वर संध्या" या दिव्यांगांच्या शिक्षण, रोजगार व आरोग्यासाठी समर्पित कार्यक्रमात दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला व उत्कर्ष प्रतिष्ठान च्या माध्यमाने पर्यावरण रक्षणाचा संकल्प करण्यात आला. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या शुभहस्ते हा संकल्प सर्व उपस्थित मान्यवरांनी घेतला. या कार्यक्रमात उपस्थित जिल्हाधिकारी निमा अरोरा, उपजिल्हाधिकारी संजय खडसे , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे, अकोला आकाशवाणी प्रमुख विजय दळवी व टेलिव्हिजन फेम कलावंतांचे स्वागत पर्यावरण पूरक साहित्य देऊन करण्यात आले. प्लास्टिक बॅग निर्मूलनाचा संदेश देणारी कागदी पिशवी, कुंडी, माती, पर्यावरण पूरक पेन व पेन्सिल या सर्व साहित्यातून वृक्ष लागवड कशी होऊ शकते? याविषयी प्रा.विशाल कोरडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या पर्यावरण रक्षणाच्या कार्यक्रमातून संपुर्ण विदर्भात जनजागृती केली जाईल अशी माहिती आयोजन समितीने दिली. प्रस्तुत उपक्रमाची स्तुती जिल्हाधिकारी निमा अरोरा, उपजिल्हाधिकारी संजय खडसे व उपस्थितांनी केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रसाद झाडे, अरविंद देव, उत्कर्ष जैन, अनामिका देशपांडे, किर्ती मिश्रा, वंदना तेलंग, शुभांगी मानकर, शंतनु जोशी, प्रशांत जोशी, स्वप्निल गुप्ते, अमित अग्रवाल, विजय पाठक, सिद्धेश्वर टिकार, विशाल इंगळे, श्रद्धा मोकाशी, प्रवीण पाटील, तृप्ती भाटिया, छाया कागदे, श्रद्धा देव व रीना सयानी यांनी सहकार्य केले.