ब्रह्मपुरी येथील कुर्झा कॉर्नर चौक येथे 9 जून ला देसाईगंज वडसा कडून वाळू भरून येणाऱ्या ट्रकचा चक्का तुटल्याने रस्त्याला अंदाजे चाळीस ते पन्नास फूट अंतरपर्यंत तुटलेला चक्का घासत ट्रक गेला.
ही बाब ब्रह्मपुरी येथील एका सामाजिक कार्यकर्त्याला समजल्याने सदर ट्रकची पाहणी केली व तेथील उपस्थित ट्रक जवळील इसमास हा ट्रक आपला आहे का असे विचारणा केली असता त्या इसमाने हो माझा आहे असे म्हणाला. त्यामुळे त्यास वाळूची रॉयल्टी आहे का असेही विचारल्यास. तू कोण आहेस? तुला काय अधिकार आहे का? काय करायचा आहे तुले करू शकतेस? अशी उद्धट भाषा वापरणे सुरू केले त्यामुळे सदर ट्रक अवैध वाळू वाहतूक करीत असावा असा संशय येणे स्वाभाविक होते.
त्यामुळे अवैध वाळू तस्करी करत असल्याचा संशय आल्याने त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी 112 वर कॉल केला असता काही वेळाने ब्रह्मपुरी येथील एका पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या सामाजिक कार्यकर्त्यास कॉल केला व आम्हाला कशाला फोन केले? हा काम कोणाचा आहे आमचा आहे का? महसूल विभागाला सांगायला पाहिजे नाही का? असे उलट प्रश्नार्थक वाक्यात बोलू लागले मात्र त्या कर्मचारी यांनी कोणतीही कार्यवाही तर दूर ते कर्मचारी घटनास्थळाकडे फेरफटका सुद्धा मारले नाही, भटकले सुद्धा नाही.
बराच वेळ झाल्याने कोणताही पोलीस कर्मचारी घटनास्थळाकडे येऊन कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी परत 112 वर कॉल केला असता 112 वरील कर्मचाऱ्यांनी सर्व हकीकत नोंदवून पोलीस कर्मचारी पाठविण्यात येणार असे सांगितले.
मात्र तदनंतर पुन्हा ब्रह्मपुरी येथील एका दुसऱ्याच पोलीस कर्मचाऱ्यांचा त्या सामाजिक कार्यकर्त्यास परत फोन आला व त्यांनीही पहिल्या पोलीस कर्मचारी यांच्याच प्रमाणे बोलणे सुरू केले. एकंदरीत 112 वर कॉल करून ही ब्रह्मपुरी पोलिसांकडून त्या ट्रक वर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने 112 वर कॉल करणे ही आता कामाचे नसल्याचे प्रत्येक त्या सामाजिक कार्यकर्त्यास आले.
एकंदरीत चोरी कोणतीही असो ती दखलपात्र असते आणि चोरीची तक्रार जर करण्यात आली तर पोलिसांनी त्वरित कार्यवाही करणे आवश्यक आहे. या वाळूच्या तस्करीमध्ये तर शासनाच्या महसुली गौण खनिजाची चोरी होत आहे त्यामुळे तर गांभीर्याने या प्रकरणाकडे पोलिसांनी लक्ष देणे महत्त्वाचे आहे. जरी महसूल विभागाचे हे काम असले, तरी महसूल अधिकारी कर्मचारी धूर्त बनून असले म्हणून पोलीस विभागाने सुद्धा त्यांच्याप्रमाणे वर्तन करणे चुकीचे नाही का? आपल्या कर्तव्यात कसूर करणे हे चुकीचे नाही का? असे या प्रकरणातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या भूमिकेमुळे विविध प्रश्न उद्भवून राहिलेले आहेत
भाग. ....१
भाग ...2
112 वर कॉल करून ही ब्रह्मपुरी पोलिसांकडून कूर्झा कॉर्नर चौक येठील ओवर लोड वाळू भरुन संशयीत अवैध, वाळू चोरीतील ट्रक वर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने 112 वर फोन करणे ही आता कामाचे नसल्याचे प्रत्यय त्या सामाजिक कार्यकर्त्यास आले.
हि बाब निंदनीय आहे.
वास्तविक यापूर्वी कितीतरी वाळू तस्करीतील ट्रक तालुक्यातील नागरिकांनी पकडले व ते ट्रक पोलिसांच्या स्वाधीन केले तत्कालीन पोलीस निरीक्षक यांनी त्यावेळेस नागरिकांची दखल घेत वाळू तस्करीतील ट्रकवर कार्यवाही देखील केली मात्र नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक यांच्या कारकीर्दीत त्यांच्या हत्यारित येत असलेले पोलीस कर्मचारी जर असे वागत असतील तर पोलीस विभागाच्या कर्तव्यावर संशयाची सुई दिसतोय.
वास्तविक चोरी कोणतीही असो ते दखलपात्र गुन्ह्यांमध्ये मोडत असतो आणि याबाबत जर नागरिकांनी तक्रारी केल्या तर त्यावर कार्यवाही करणे हे पोलिसांचे कर्तव्यच.
मात्र आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्याने पोलीस विभागाच्या कार्यप्रणालीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
वडसाकडून अनेक ट्रक अवयव वाढू वाहतूक करीत असतात हे तपासायचे झाल्यास पोलीस यंत्रणेद्वारे लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले तर दिवसातून कितीतरी ट्रक वाढू वाहतूक करत असताना दिसून येतील. यातील त्यांचे नंबर वरून व्हेरिफिकेशन विभागास चौकशी केल्यास कितीतरी ट्रक अवैध वाढू वाहतूक करीत असल्याचे निष्पन्न होणार यात काहीही शंका नाही मात्र एवढी मोठी वाळू तस्करी होत असताना महसूल विभाग जाणीवपूर्वक जरी लक्ष करत नसले तरी पोलीस विभागाने सुद्धा याकडे लक्ष देऊ नये आणि अशी भाषा पोलीस कर्मचाऱ्यांनी वापरणे हे खरच राष्ट्र आहे का पगार शासनाचा घ्यायचा व काम कडून करायचा अशी भूमिका या निमित्ताने पोलीस विभागाने घेतली काय असा मोठा प्रश्न सामोरे येतोय.
आपल्या प्रतिक्रिया द्या....