चंद्रपूर, दि. 26 : सोयाबीन पिकाची काढणी व मळणीची कामे जवळपास 80 ते 85 टक्के पूर्ण झाली असून बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीस सुरुवात केली आहे. सोयाबीनचे बहुतेक वाण आता शेंगा फुटण्यास प्रतिरोधक असले तरी, काही जातींमध्ये शेंगा फुटण्याचे नुकसान वाढले आहे. कापणी नंतरचे व्यवस्थापन म्हणजे शेल्फ लाइफ, ताजेपणा आणि आकर्षक स्वरुप वाढविण्यासाठी कापणीनंतर कृषी उत्पादनांची हाताळणी, कापणी, मळणी, पॅकेजिंग, साठवण आणि वाहतूक इ. दरम्यान कापणीनंतरच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे सुमारे 9 ते 10 टक्के धान्य वाया जाते. कापणीनंतरचे योग्य वैज्ञानिक व्यवस्थापन हे नुकसान कमी करु शकते. कापणीनंरतरच्या व्यवस्थापनाप्रमाणेच योग्य कापणीच्या साधनांचा वापर आणि योग्य कापणीपूर्व उपायोजनांमुळे धान्याची साठवणूक आयुष्य सुधारते आणि कापणीनंतरचे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी करता येते.
शेतकऱ्यांनी सद्याच्या परिस्थितीत सोयाबीन पिकाची कापणी व मळणी करतांना खालीलप्रमाणे निर्देशांचा अवलंब केल्यास धान्याची प्रत चांगली राहून योग्य बाजारभाव मिळू शकतो.
1. कापणी झालेल्या परंतु पावसाच्या हवामानामूळे मळणी न झालेल्या सोयाबीनचे एकत्र ढीग किंवा गंजी करून ठेवण्यात आलेल्या सोयाबीनची मळणी करतांना सर्वप्रथम गंजी मोकळी करा. तसेच गंजी कोरडया जागेवर सुकवणीस पसरावे व काडाची उलथापलट करत राहावी. काड व दान्यातील आर्द्रता कमी झाल्याची खात्री करुनच मळणीबाबत निर्णय घ्यावा. 2. ज्या ठिकाणी सोयाबीनची कापणी झालेली नाही अशा ठिकाणी कापणी करतांना स्वच्छ हवामान पाहून 90 टक्के शेंगा वाळल्यानंतर बियाण्यातील ओलावा 17 ते 20 टक्के असताना पिकांच्या कापणीला सुरवात करावी. 3. पेरणी केलेल्या आणि उशिरा पक्व होणाऱ्या वाणांसाठी देखील शेंगांचा रंगात बदलानुसार पिकाची कापणी करावी. 4. शेंगा पिवळया असताना कापणी केलेले उत्पादन ताबडतोब उन्हात वाळवावे व त्याची मळणी करावी. 5. परिपक्वतेच्या वेळी पावसामुळे शेंगा दाणे फुटल्याने होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि दर्जेदार मळणीसाठी कापणी केलेले पीक योग्य प्रकारे वाळवावे.
6. कापणी करतांना झाड उपटून येणार नाही याची काळजी घ्यावी. झाड उपटून आलेच तर मुळांना लागलेली माती झटकून घ्यावी, माती मुळांना लागून मळणी करताना मिसळली जाते आणि गुणवत्ता ढासळते. 7. वेळेवर कापणी केल्यास मळणीमध्ये बियांचे नुकसान होत नाही. पिकाची काढणी करताना धारदार विळा किंवा कोयत्याचा वापर करावा. 8. काढणीनंतर सोयाबीनचे एकत्र ढीग किंवा गंजी करुन ठेवू नये. यामुळे त्यास बुरशी लागून धान्याची प्रत खालावते. 9. काढणी केलेले पीक उन्हामध्ये चांगले वाळवावे. मळणीसाठी उशीर होणार असेल तरच वाळलेल्या सोयाबीनची गंजी करून ठेवता येईल. पावसाचे वातावरण असल्यास सर्व शेतमाल एकत्र करून मोठी गंजी लावून झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. 10. मळणी केलेले धान्य स्पायरल सेपरेटर किंवा धान्य स्वच्छता केंद्रावर प्रतवारी करुन घ्यावी. योग्य दर्जाच्या प्रतवारी केलेल्या धान्यास प्रति क्विंटल 200 ते 500 रु. अतिरिक्त दर मिळतो.
वरीलप्रमाणे सोयाबीन विक्री करीत असतांना खबरदारी घेतल्यास आधारभूत खरेदी केंद्रावर विक्री करण्यास अडचण निर्माण होत नाही व शेतकऱ्यांचे श्रम व पैसा वाया जाणार नाही, असे आवाहन कृषी विभाग तथा जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
००००००
आपल्या प्रतिक्रिया द्या....
=================================
Post Views: 76