1 डिसेंबर जागतिक एड्स दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय आरमोरी व हितकारिणी उच्च माध्य विद्यालय आरमोरी यांनी रॅली काढून लोकांपर्यंत एड्स संदर्भात माहिती पोहचविली.
विद्यालयाच्या परिसर बर्डी, वडसा टी पाईन्ट या ठिकाणी घोषवाक्यानी परिसर दुमदूमला यात एक दो एक दो -एड्स को फेक दो, नैतिकता पाळा-एड्स टाळा या घोषनेने जनजागृती केली.
रॅलीचे समारोपात मा.नरेंद्र कोकुर्डे शिक्षणाधिकारी आरमोरी,मा.जय फुलझेले प्राचार्य हितकारिणी विद्यालय आरमोरी,मा. विजय सुपारे, मा. प्रवीण राहाटे, प्रा. संदीप प्रधान, प्रा. राजेंद्र दोनाडकर, प्रा. आशिष म्हशाखेत्री, प्रा. रूमदेव सहारे, प्रा. मोहन राखाडे, प्रा. कु. टीना साळवे, प्रा. कु. वैशाली मेश्राम उपस्थित होते त्याचबरोबर गौरी साळवे लॅब टेक्निकल यांनी एड्स संदर्भात माहिती दिली व आशिष वासनिक समुपदेशक यांनी रॅलीचे आभार केले.