वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) :-भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला व्यापारी,उद्योजक यांना व्यवहार करताना अनेक प्रकारच्या अडचणी सातत्याने येत असतात.परंतु त्यांचा स्वतंत्र प्रतिनिधी नसल्याने अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते.परिणामी नुकसान सहन करावे लागते. विधानपरिषदेतस्वतंत्र प्रतिनिधी असल्यास भरपूर उद्योग वाढतील.व परिणामी बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल.
पदवीधर मतदार संघ,शिक्षक मतदार संघ याची स्वतंत्र व्यवस्था असल्याने त्यांचे प्रतिनिधी दर सहा वर्षांनी निवडणुका मार्फत निवडले जात असल्याने सरकार दरबारी अडचणी सोडवल्या जातात.त्याच धर्तीवर व्यापारी व उद्योजक यांच्या अडचणी सोडवण्याकरिता स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीचे निवेदन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अमरावती भेटी दरम्यान देण्यात आले.यावेळी ज्येष्ठ नेते किरणराव पातुरकर MIDC असोसिएशन अध्यक्ष, भाजपा माजी शहर अध्यक्ष, श्याम पाध्ये सह संयोजक प. विदर्भ उद्योग आघाडी,विवेक चूटके OBC शहराध्यक्ष,धीरज बारबुद्धे,रीता ताई मोकलकर, श्याम साबळे,छोटू वानखडे, विशाल डहाके,अमोल आगरकर, अतुल देशमुख,ऋषिकेश देशमुख, मनोज काळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.