नागभीड येथिल एस. आर. व्ही. नर्सिंग स्कुल अँड रिसर्च इंस्टिटयूट (जी.एन.एम. व ए.एन. एम.) नागभीड जि. चंद्रपुर येथे १२ मे रोजी फ्लारेंस नाइटिंगेल यांचा जन्म दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरवात "आधुनिक नर्सिंग ची जननी फ्लारेंस नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे दिप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी मा. सचिन बनकर, प्रमुख पाहुणे मा. रोशन बावनकर तसेच मार्गदर्शक म्हणून प्रा. नेहा शिदि हया उपस्थित होत्या. मान्यवरांनी फ्लारेंस नाइटिंगेल यांच्या विषयी विचार व्यक्त करून विद्याथ्यांना त्याच्या उज्वल भविष्याच्या वाटचालीकरीता शुभेच्या दिल्या..
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जी. एन. एम. व्दितीय वर्षांची विद्यार्थ्यांनी कु. नोवाली नागापूरे हिने केले तर आभार ए. एन. एम. प्रथम वर्षांची विद्यार्थ्यांनी क. विशाखा कालाम दिन मानले. कार्यक्रम कु. यशस्वी करण्यासाठी जी.एन.एम. नर्सिंग व ए.एन.एम. नर्सिंग च्या विद्यार्थ्यांनी तसेचे सुनिल बोरकर यांनी मोलाचे सहकार्य केल व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.