अकोला : स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग बांधवांसाठी विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण भारतभर राबवले जात आहेत .
या उपक्रमांतर्गत दिनांक ९ ऑक्टोबर २०२३ रोजी हॉटेल सेंटर प्लाझा येथे दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला व लिनेस क्लब अकोला तर्फे दिव्यांगांना व्हीलचेअर , ब्रेलबुक्स व पांढऱ्या काठीचे वितरण करण्यात आले . यावेळी मंचावर दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.विशाल कोरडे सदस्य नीता वायकोळे , अस्मिता मिश्रा , साक्षी तायडे , तपस्या गोलाईत लिनेस क्लब अकोला चे नम्रता अग्रवाल,सुलेखा गुप्ता,उमा बाजोरिया,शितल अग्रवाल व स्वाती झुणझुणवाला उपस्थित होते . यावेळी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला व लीनेस क्लब अकोला तर्फे मातोडी येथील पोलिओग्रस्त दिव्यांग घनश्याम भांडे यांना व्हीलचेअर तर १० अंध विद्यार्थ्यांना ब्रेल बुक्स व पांढऱ्या काठीचे वितरण करण्यात आले.प्रा.कोरडे यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या आंतरराष्ट्रीय उपक्रमाची माहिती उपस्थितांना दिली.
त्याचबरोबर दिवाळी निमित्त दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या विविध वस्तूची खरेदी करून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे लीनेस क्लब अकोला च्या नम्रता अग्रवाल यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला . नम्रता अग्रवाल,सपना अग्रवाल ,गीता रुपारेलिया यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला चे आभार व्यक्त केले. विविध सामाजिक उपक्रमात लिनेस क्लब अकोला नेहमीच सहभागी होणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले,ज्याला अकोलेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला . कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनामिका देशपांडे, ज्योती नागडिया,स्वाती अग्रवाल ,अंजु अग्रवाल,साक्षी रहेजा व संजय ठोकमारे यांनी सहकार्य केले.