कारंजा (जिल्हा प्रतिनिधी : संजय कडोळे) : कारंजा ते यवतमाळ मार्गावरील सावंगी रेल्वे लगतच्या फाट्यावरून दोन कि.मी.आत धामणगाव देव मार्गावरील, यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात येणाऱ्या,रामगाव (रामेश्वर) या गावखेड्याला,अतिवृष्टीच्या भयंकर पावसाने आलेल्या अडाण नदीच्या महापुराने आणि अडाण धरणाचे पाच दरवाजे उघडून पाणी सोडल्यामुळे, अचानकपणे "न भुतो न भविष्यती" अशा प्रकारचा महापुराचा भयंकर असा वेढा पडला.आणि बघता बघता अख्खे गावच्या गावच आणि गावातीले जवळ जवळ सगळीच घरे पाण्यात डूबली.गावकऱ्यांचा घरातील साठवलेला किराणा, धान्य,कपडालत्ता,भांडीकुंडी, अंथरून पांघरून,इंधन सरपन सर्व काही वाहून गेले.किंवा शिल्लक असेल नसेल ते नाश पावले. महापुराने त्यांच्या शेतातील संपूर्ण पिके नष्ट झाली.आज रोजी पूर उतरल्यानंतर मात्र त्यांच्या गावात सगळीकडे औदास्याचे वातावरण आहे.घरात स्वयंपाक करायला चूल पेटवता येत नाही.
या घटनेचे वृत्त कारंजा शहरात येऊन धडकताच कारंजा येथील श्री नृसिह सरस्वती स्वामी महाराज संस्थान कारंजा यांनी धान्य,कीराणा,खाद्यपदार्थ, भोजन आणि कापडाचे वाटप मोठ्या प्रमाणात केले.कारंजा येथील अनेक मानवसेवी स्वयंसेवी संस्था स्वयंस्फूर्तीने पुढे सरसावल्या आणि त्यांनी मदतीचा हात पुढे देत "फुल ना फुलाची पाकळी" या प्रमाणे मदतीचा हात पुढे दिला. त्यांच्या जिल्ह्यातील सुध्दा दानशूर आणि संस्था पुढे येत आहेत.मात्र पूरग्रस्तांच्या मदतीला गेलेल्या काही लोकांना मात्र,कटू अनुभव येत आहेत. शासनाचे लोकप्रतिनिधी,आमदार, राज्यमंत्री, जिल्हाधिकारी कोणी कोणीच अद्याप पाहणी करायला न आल्याने रामगाववासी भयंकर संतापले असून,आता ते गावाच्या पुर्नवसनाची आणि १००% नुकसान भरपाईची मागणी करीत असल्याचे वृत्त प्राप्त झाले आहे.