अकोला ; स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाचे संस्थापक अध्यक्ष व श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात विविध सामाजिक उपक्रम संपूर्ण भारतभर राबवले जात आहेत . भारतीय संस्कृती , समाजजीवन व राष्ट्रीय एकात्मतेचा वारसा जोपासणारा आरसा म्हणजे दिवाळी अंक आणि हा दिवाळी अंक भारतीय संस्कृतीतून आज नामशेष होत आहे . या दिवाळी निमित्त डॉ.विशाल कोरडे हे आय एस बी एन क्रमांक असलेल्या दिवाळी अंकाचे लेखन व प्रकाशन करणार आहेत . *आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित होणाऱ्या या दिवाळी अंकासाठी कविता , लेख,कथा , गझल , चारोळी , प्रवास वर्णन , ललित लेख , विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन , चित्रपटसृष्टीतील घडामोडी , शाळा महाविद्यालय व विविध सामाजिक संस्थांचे वार्षिक अहवाल , नोकरी क्रीडा व उद्योग मार्गदर्शन , छोट्या व्यवसायिकांची माहिती खाद्यपदार्थांची रेसिपी , बँकिंग व सायबर सुरक्षा , दिव्यांग मार्गदर्शन व यशस्वी व्यक्तींच्या मुलाखती अशा विविध विषयावर साहित्य दि.७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत आमंत्रित केले गेले आहे* . प्रस्तुत दिवाळी अंकाला दिव्यांग बांधवांच्या शिक्षण , रोजगार व आरोग्यासाठी समर्पित केले असून ज्यांना या दिवाळी अंकासाठी आपले साहित्य पाठवायचे आहे त्यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या ९४२३६५००९०या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून divyangsocialfoundation@gmail.com या ईमेलवर आपले साहित्य पाठवावे असे आव्हान संपादक मंडळाचे डॉ.विशाल कोरडे,अनामिका देशपांडे, भारती शेंडे,डॉ.संजय तिडके व चंद्रकांत अवचार यांनी केले आहे . प्रस्तुत जागतिक दर्जाचा दिवाळी अंक अंध बांधवांसाठी ब्रेल लिपीत व ऑडिओ बुक च्या स्वरूपात प्रथमच प्रकाशित केला जाईल . अंध बांधवांना हा दिवाळी अंक निशुल्क रित्या दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे वितरित केला जाणार असल्याने समाजातील दानशूर व्यक्तींनी या सामाजिक उपक्रमाला हातभार लावून सहकार्य करावे अशी माहिती मुख्य संपादक डॉ.विशाल कोरडे यांनी दिली आहे .