खास गणेशोत्सव काल्याच्या निमित्ताने तालुक्यातील खरकाडा येथे नवनिर्माण सार्वजनिक गणेश मंडळ, खरकाडाच्या वतीने "आघात - रक्तात आटली आसवे" या नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोदभाऊ चिमूरकर यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी सहउद्घाटक म्हणून विशालभाऊ राखडे ब्रम्हपुरी, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नानाजी तुपट माजी तालुका अध्यक्ष काँग्रेस किसान सेल ब्रह्मपुरी तर कार्यक्रमाचे उपाध्यक्ष म्हणून योगेश्वर ढोरे मा. अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी किन्ही, उत्तमजी बनकर रुई उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून तुकारामजी ठाकरे, उत्तमजी बगमारे व विशेष अतिथी म्हणून आनंदभाऊ शिवुरकार सर ब्रम्हपुरी, लक्ष्मण मेश्राम सर ब्रम्हपुरी, ताराचंदजी पारधी उपसरपंच खरकाडा, हिरामण मुळे अध्यक्ष म. गां. त. स. खरकाडा, प्रफुल ठाकरे ग्रा. पं. सदस्य, समीर रवींद्र ढोरे, राजेश्वर शिवूरकार, मंगरे सर, हेमंत शेलोकर. आदी मान्यवर उपस्थित होते.
या नाटकाचे उद्घाटन प्रसंगी प्रमोदभाऊ चिमुरकर म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात समाज प्रबोधनासाठी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा महाराष्ट्रात आजही आपण त्याच हिरिरीने जपतो आहे. सार्वजनिक मंडळांबरोबरच घरोघरीही गणेशाची सुंदर आरास केली जाते. घरोघरी छोटेखानी देखावे साकारले जातात. अशा देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देखील दिला जातो. गावातील कलाकारांनी सादर केलेली नाटक ही गावातील कलाकारांना प्रोत्साहन देणारे आहे. गणेश उत्सव मंडळांनी या गणेशोत्सवात जनजागृती कार्यक्रम, रक्तदान शिबिर असे विविध लोकाभिमुख उपक्रम राबवावेत. असे प्रतिपादन माजी जि. प. सदस्य प्रमोदभाऊ चिमुरकर यांनी केले.
_या नाटकाला गावकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. नाटकेच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवनिर्माण सार्वजनिक गणेश मंडळ, खरकाडाच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.