वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना आज दिनांक:-१४/५/२०२२ ला सकाळी ७: ०० वाजताच्या सुमारास आरमोरी येथील आय.टी.आय जवळ घडली आहे.
मृतक अल्पभुधारक शेतकऱ्यांच नाव नंदू मेश्राम वय वर्षे ५४ असे असून आरमोरी येथील रहिवाशी आहे.
अल्पभूधारक शेतकरी नंदुजी हे आपल्या स्वताच्या शेतावर धानपिकाची देखभाल करण्यासाठी सकाळी ७ :०० वाजताच्या सुमारास गेले असतां बांधाआड दबा धरून बसलेल्या वाघाने नंदूजी वर हल्ला चढवून दोन बांधाआड ओढत नेत ठार केले. घटनास्थळी नागरिकांची मोठया प्रमाणात गर्दी उसळली आहे. सलग दोन दिवस आरमोरी तालुक्यात अगदी आरमोरी सभोवताल वाघांच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना घडल्या असून परीसरात भीतीचे वातारण पसरले आहे.
नंदुजी हे अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे मिस्त्री कामगार होतें घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे थोड्या शेतामध्ये पोटाची खळगी भरणे कठीण होते त्यामुळे ते सकाळी शेतावर धानपिकाची देखभाल करणे व ९:०० वाजता मिस्त्री कामवार जात असायचे. मात्र नियतीला मान्य नव्हते आणि नियतीने क्रूर डाव खेळला आणि वाघाने नंदुजी वर हल्ला करुण नंदूजीच्या नरडीचा घोट घेत ठार केलें. नंदूजीच्या जाण्याने मेश्राम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावपरीसर व मेश्राम कुटुंब शोकसागरात बुडालेला आहे.
तरी नरभक्षक वाघाचे संभाव्य धोके लक्षात घेता संबधित वनविभागाने त्वरित जेरबंद करावा व आर्थिक मदत देण्याची मागणी मेश्राम कुटुंबीय व ग्रामवासियानी केली आहे.