१२ मार्च २०२२ ला तोरगाव गावा जवळ रात्रौ ११ वाजताच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहणांवर शासकीय नियमावली नुसार कुठलीही कारवाई न करता तालुक्यातील ३ तलाठी मुन, इसड आणि सोनेकर या कर्मचाऱ्यांनी छान्नव (९६) हजार रुपयाचे परस्पर आर्थिक व्यवहार करीत आपसी समझोत्याने पाहार्णी येथील दोन तर तोरगाव येथील एक वाहन सोडून दिल्याची लेखी तक्रार स्थानिक प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी पत्रकारांना देतं, लाचखोर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही व्हावी व तस्करीला लगाम यावा अशी विनंती केली होती. याबाबत स्थानिक वृत्तपत्रांमधून बातम्या सुद्धा प्रकाशित झाल्यात तर स्थानिक पत्रकारांच्या शिष्टमंडळा तर्फे उप विभागीय अधिकारी ब्रम्हपुरी यांना भेटून निवेदन देतं कारवाई ची मागणी करण्यात आली मात्र सदर कर्मचाऱ्यांवर कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
अवैध वाळू तस्करी करीत शासनाचा महसूल बुडवणाऱ्या वाहण धारकासह परस्पर आर्थिक व्यवहार करीत कर्मचारी, अधिकाऱ्यांकडून लाचखोरी चे प्रकार तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढल्याने तालुक्याच्या प्रतिमेला महसूल प्रशासनाच्या लाचखोरीने धक्का लागत असून तालुक्याची सर्वत्र बदनामी होत आहे. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करीत मंत्रालयात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना प्रत्यक्ष भेटून शिवसेना तालुका ब्रम्हपुरी तर्फे तक्रार निवेदन देण्यात आले. तालुका महसूल विभागात वाढलेल्या लाचखोरीच्या प्रकाराने शिवसेना ब्रम्हपुरी तर्फे घेण्यात आलेल्या कठोर भूमिकेने तालुक्यात सर्वत्र ब्रम्हपुरी शिवसेनेच्या भूमिकेचे स्वागत होतं आहे तर सदर प्रकरणातील लाचखोरांवर कारवाई व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होतं आहे