स्थानिक जिल्हा परिषद नगर खडकी अकोला येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी श्री संत आदिशक्ती मुक्ताई संस्थान श्री शेत्र मेहून तापीतीर येथील ह भ प श्री गुरुवर्य सारंगधर महाराज मेहुणकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूल समितीचे संघटक शरद वानखडे, डी एम के मंडळाचे अध्यक्ष दादाराव पाथरीकर, मा.ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल हरणे, मधुकरराव आढे, देशमुख ताई शेळके ताई,सुधाकर पोळकर, वाघ साहेब, गणेश बचे, रवी बचे आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला तसेच मा. ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते अनिल हरणे यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्या सन्मान गुरुवर्य सारंगधर महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन समाजसेवक गजानन हरणे यांनी तर आभार प्रदर्शन दादाराव पाथ्रीकर यांनी केले. यावेळी जी प नगर खडकी परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.