कारंजा (लाड) : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती संपूर्ण भारतात साजरी केली जात असतांनाच दरवर्षी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील प्राधान्याने साजरी केली जात असते.कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सन्माननिय सभापती तथा विद्यमान आमदार माईसाहेब डहाके यांची मतदार संघाच्या कामकाजा निमित्ताने, राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेन्द्रजी फडणवीस यांची भेट ठरलेली असल्यामुळे त्यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे पूजन व अभिवादन नागपूर येथील शासकीय निवासस्थानी रामगीरी बंगल्यावर केले.तर इकडे कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात बाजार समितीचे कर्तव्यतत्पर सचिव निलेशजी भाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी बाजार समिती मुख्य कार्यालयात, सचिव निलेशजी भाकरे यांनी सर्वप्रथम दिपप्रज्वलन करून,राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन केले.तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कार्यकाळात भारतभर,प्रजेकरीता केलेल्या राज्यकारभाराची त्यांच्या लढ्याची,त्यांच्या न्यायदानाची, सामाजिक,आध्यात्मिक व धार्मिक कार्याची माहिती दिली. याप्रसंगी बाजार समितीचे इतर कर्मचारी वृंद किशोर शिंदे,किरण देशमुख,सोनवने,अनिल भेलांडे,प्रशांत सावळे,चेतन चौधरी आदींनी सुद्धा राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे पूजन व अभिवादन केले.पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयजयकाराने कार्यक्रम सांगता करण्यात आली.