ब्रम्हपुरी :
ब्रम्हपुरी परिसरात अतिवृष्टीमुळे शेतीचे भयंकर नुकसान झाले. अवघे धान व इतर पिके पाण्यात बुडाल्याने नापिकीसदृश्य स्थिती निर्माण झाली. यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला. या परिस्थितीची दखल घेत शासनाने नुकसान भरपाईची घोषणा केली. सर्वेक्षणानंतर अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली. मात्र, काही शेतकरी या लाभापासून वंचित आहेत. सर्वेक्षणानंतरसुध्दा त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. तर काही शेतकऱ्यांना सर्वेक्षण न करतासुध्दा आडमार्गाने नुकसान भरपाई देण्यात आली.
खेड मक्ता तलाठी साजा अंतर्गत खेड, मरारमेंढा, सायगाटा, माहेर, तुमडी मेंढा, खरबी, लाखापूर या गावातील शेतकऱ्यांनी याबद्दल खंत व्यक्त केली.
तसेच चिमूर व नागभीड तालुक्यातील नुकसान भरपाईपासून वंचित शेतकऱ्यांनासुध्दा आर्थिक मोबदला देण्याचे निर्देश देण्यात यावेत. नुकसान भरपाईपासून वंचित शेतकऱ्यांना नियमानुसार त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात यावी अशी मागणी
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चिमूर विधानसभा क्षेत्राचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अमृत नखाते यांचे नेतृत्वात माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना ब्रह्मपुरीचे तहसीलदार उषा चौधरी यांच्यामार्फत निवेदन प्रेषित करण्यात आले.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत ब्रम्हपुरीचे तहसीलदार उषा चौधरी यांनी मंडळ अधिकारी तलाठी कृषी सहाय्यक यांना त्वरित सर्वेक्षणाचे आदेश दिले. यावेळी केवळराम पारधी शिवसेना उपतालुकाप्रमुख ब्रह्मपुरी, शामराव भानारकर माजी शहरप्रमुख ब्रह्मपुरी, रमाकांत अरगेलवार, गुलाब बागडे विभाग प्रमुख खेडमक्ता, विनोद राऊत सरपंच लाखापुर, देवदास पिसे, सतीश पिसे, नरहरी जेंगठे, सिद्धार्थ बनकर, रवींद्र शेंडे, छत्रपती दिगोरे,गणेश बागडे, मनोहर लेनगुरे, गुलाब मेश्राम व संख्या शिवसैनिक व नुकसानग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते
आपल्या प्रतिक्रिया द्या....