ब्रम्हपुरी:-
दिनांक 25/7/2024 ला महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियान शाखा ब्रम्हपुरी येथील टीम सोबत संवाद साधताना दिव्यांग व्यक्तीचे अधिकार विषय समन्वयक संगिता तुमडे यांनी प्रतिपादन केले, आम्ही आमच्या आरोग्यसाठी संस्था कुरखेडा द्वारा संचालित “ समुदाय आधारित दिव्यांग व्यक्तीचे पुनर्वसन” या प्रकल्पाच्या वतीने दिव्यांग व्यक्ती जाणीव-जागृती संवेदनशील कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेला उपस्थित ब्रम्हपुरी शाखेचे व्यवस्थापक मा. मनोज मेश्राम, मा. अमीरखान सर, छत्रपती बगमारे, अमोल मोडक, संदीप उईके, गोपिका मेटे, सोपान तडोसे, प्रशित मेश्राम, प्रकाश अलोणे, सारिका ,ममता आणि अनिताताई इत्यादी तालुका अभियान कक्ष उपस्थितांच्या समन्वयाने हि कार्यशाळा घेण्यात आली, या कार्यशाळेत व्यवस्थापकासहित 100 लोक उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करतांना खालील विषय चर्चिल्या गेले. दिव्यांग व्यक्तीची ओळख. दिव्यांग व्यक्तीचे प्रकार आणि योजना संबंधित विभाग , दिव्यांग व्यक्तीचे कायदे, योजना, दिव्यांग व्यक्तीला दैनदिन जीवनामध्ये सतावणाऱ्या समस्या, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक, हिंसात्मक, शैक्षणिक, इत्यादी विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले, दिव्यांग व्यक्ती अजूनही उपेक्षितांचे जीवन जगत असताना दिसतोय.

त्यांच्या अधिकारानुरूप त्यांना आवश्यक अशा बिबिंची पूर्तता करण्यात शासन किंवा समाज कमी पडताना दिसतोय, दिव्यागत्वाच्या प्रकारानुरूप त्यांना व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे अनेक दिव्यांग शासकीय योजनेपासून वंचित आहे, दिव्यांग व्यक्ती अजूनही प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहे. सोई सुविध्याच्या अभावामुळे शिक्षणापासून वंचीत, वाढीव मानधनाच्या प्रतीक्षेत अशा अनेक बाबीना घेऊन दिव्यांग अजूनही अडथळयाशी सामना करीत आहे, भेदभाव /अडथळा विरहीत समाज निर्माण होण्याची स्वप्न बघत जगतो आहे, दिव्यांग व्यक्तीचा समाज हा कुटुंबातच तयार होतो. कुटुंबातच दिव्यांग व्यक्तीला मानसन्मान मिळावा, कुटुंबातील लोक समजून घ्यावे. समाज दिव्यांग व्यक्तीच्या प्रकारासाहित व्यक्तीला समजून घ्यावे. अतितीव्र दिव्यांगत्वामुळे दिव्यांग व्यक्ती मानसन्मान आणि विकासात्मक प्रवाहपासून वंचित आहे, अतितीव्र व्यगत्वामुळे हालचाल करू शकत नाही, अशा वेळी आपण समाज म्हणून दृष्टीस पडताक्षणी त्यांची ग्रामपंचयत मध्ये नोंदनी करून असलेल्या योजना सोबत जोडून घेणे, ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांगसाठी 5% निधी राखीव असतो कायदे. समान संधी हक्काचे संरक्षण पूर्ण सहभाग 1995 चा कायदा, 1999 राष्टीय न्यास कायदा, 1994 अवयव प्रत्यारोपण कायदा, 1987 विधिसेवा प्राधिकरण अधिनियम, 2005 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2009 शिक्षण अधिकार कायदा अधिनियम, 1992 राष्ट्रीय पुनर्वसन कायदा, 2016 विकलांग व्यक्तीचे अधिकार अधिनियम, 2005 राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना/ कायदा योजना. महाराष्ट्र राज्य महापरीवाहन महामंडळाच्या बस प्रवासामध्ये ¼ सवलत, मतीमंद मुलांचे प्रीमियम भरण्यासाठी निरामय योजना, संजयगांधी निराधार योजना,वृधापकाळ श्रावणबाळ योजना,केंद्रीय वित्त विकास महाराष्ट्र वित्त विकास महामंडळा आर्थिक विभागाच्या योजना,दिव्यांग प्रमाणपत्र, रेल्वेपास, स्वावलंबन कार्ड, दिव्यांग कल्याणार्थ 5% निधी वितरण, घरकरामध्ये 50% सुट, सरकारी सेवेमध्ये 4% आरक्षण, गरजेनिहाय साहित्य उपलब्ध करून देणे, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये क्षमतेनुसार काम देणे, विवाह प्रोत्साहन योजना, मनोधर्य योजना, दिव्यांग व्यक्तीसाठी 20 मिनिटाच्या वेळेची सूट शिक्षण कार्यकाळ आणि शासकीय सेवा, प्रवासभत्ता, शिषवृत्ती, घरकुल योजना, सिकलसेलग्रस्त रुग्णांसाठी प्रवास भाडा रुग्ण आणि साथीदारास मोफत सवलत, न. मु. आवास घरकुल योजना, बैशाखी, सेन्सार काठी, आधारकाठी, साधी काठी, कॅलीपर बूट, व्हीलचेअर, ट्रायसिकल, तीन चाकी सायकल, ऑब्याकस, टोचण, पांढरी काठी,ADL कीट, MR कीट जॉब कार्ड, CP टेबल, सगणक, किसान सन्मान योजना, अन्तोदय कार्ड, चष्मा बहिवक्र भिंग,जातप्रमाणपत्र,MSRLM, विधिसेवा प्राधिकरण 1987, ब्रेल कीट, आर्तीफिसल हात-पाय, मोबाईल, ई -रिक्षा, आयुष्मान भारत कार्ड, कमोट टायले, यांना घेऊन संवाद साधण्यात आले, अभियान कक्ष यांच्या कडून उत्तम सहकार्य मिळाला, त्यांचे मनस्वी आभार
आपल्या प्रतिक्रिया द्या....