वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज 13 ऑक्टोबर रोजी ओबीसी जागर यात्रेनिमित्त मानोरा तालुक्यातील बंजारा समाजाचे तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे आले असता त्यांनी माता जगदंबा देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
यावेळी देवेन्द्रजी फडणवीस यांनी संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.बंजारा धर्मगुरु बाबुसिंग महाराज यांची देखील भेट घेऊन त्यांचे आशिर्वाद घेतले.यावेळी पालकमंत्री संजयभाऊ राठोड,केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड,खा.भावना गवळी,आमदार राजेंद्र पाटणी व ऍड.निलय नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी देवेन्द्रजी फडणवीस यांनी संत सेवालाल महाराजांच्या समाधी मंदिराच्या बांधकामाची पाहणी देखील केली.
आणि श्रीक्षेत्र पोहरादेवी येथील विकास कामाकरीता निधी कमी पडू दिला जाणार नसल्याबाबत आश्वासित केले असल्याचे वृत्त आमचे प्रतिनिधी संजय कडोळे यांना दूरध्वनीवरून प्रत्यक्षदर्शी प्रतिनिधीने कळवीले आहे.