चंद्रपूर : दाताळा रोडवर जगन्नाथ बाबा मठाजवळ सुरु होणारे देशी दारूचे दुकान रविवारी उद्घाटनाच्या दिवशीच जनविकास सेनेने बंद पाडले होते. शाळा, महाविद्यालय तसेच जगन्नाथ बाबा मठ असताना येथे दारु दुकान सुरु न करता स्थालांतरीत करावे, या मागणीसाठी जनविकास सेनेच्या नेतृत्वात परिसरातील नागरिकांनी सोमवारपासून सत्याग्रह आंदोलन सुरु केले आहे.
दाताळा रोड मार्गावर नव्याने सुरु होणाऱ्या दारु दुकानाजवळच जगन्नाथ बाबा मठ आहे. हे मठ अनेकांचे श्रद्धास्थान आहे. यासोबतच या परिसरात चांदा पब्लिक स्कूल, इंदिरा गांधी गार्डन स्कूल यासह विविध शाळा महाविद्यालये आहेत. त्यामुळे येथे दारुभट्टी सुरु झाल्यास विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम पडतील. परिसरातील शांतता भंग होईल. त्यामुळे रविवारी उद्घाटनाच्या दिवशीच जनविकास सेनेने आंदोलन करुन दारुदुकान बंद पाडली होती. सोमवारी परिसरातील सर्व नागरिक एकत्र येत परिसरातून दारुभट्टी इतरत्र स्थालांतरित करावी, या मागणीसाठी सत्याग्रह आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात नामदेव पिपरे,भूषण माकोडे, मिथलेश जुमडे, मोंटू कातकर, दिनेश कंपू, सोनू साव, शुभम, विलास जाधव, कल्पेश पोलावार, रंगारी, मार्शेटवार, सुरेश मर्चेंटवार. निखिल कोसारे,बाळू अस्वले, मनोज गिरडकर सहभागी झाले होते. या सत्याग्रह आंदोलनामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रमोद पुण्यपवार, प्रफुल बैरम, संदीप कष्टी, गोलू दखणे यांनी केलेले आहे.
स्थलांतराशिवाय आंदोलन मागे नाही- पप्पू देशमुख
जगन्नाथ बाब मठ, हनुमान मंदिर असे धार्मिक परिसर तसेच विविध शाळा महाविद्यालय असतानाही दारु दुकानाला परवानगी मिळालीच कशी असा प्रश्न आहे. जोपर्यंत या परिसरातून दारु दुकान हटविण्यात येणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा वडगाव प्रभागाचे नगरसेवक तथा जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी दिला आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....