कारंजा (लाड) : दरवर्षी १ मे रोजी,महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापनदिन महाराष्ट्रदिन म्हणून राज्यशासनाकडून आनंदोत्साहात साजरा केल्या जात असतो.या परंपरेनुसार यंदाही दि. १ मे २०२३ रोजी, सकाळी ठिक ०८ : ०० वाजता,कारंजा तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात,कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघाचे सदस्य, आ.राजेंद्रजी पाटणी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला असून सदर्हू कार्यक्रमाला,कारंजा महसूल विभागाचे,उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे,तहसिलदार कुणाल झाल्टे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.तरी महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला कारंजा तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर,राजकिय पक्षाचे पदाधिकारी,पत्रकार व सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असे वृत्त महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळविले आहे.