कारंजा :- कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय भाजपा आमदार राजेंद्र पाटणी साहेब यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत कारंजा व मानोरा तालुक्यातुन प्रस्तावित केलेल्या विकास कामांना जुलै २०२३ च्या अर्थ संकल्पात ३३ कोटी २३ लाख रुपयांच्या कामांना मंजुरात मिळाली आहे. जुलै २०२३ च्या अर्थ संकल्पात मंजूर कामे मतदार संघातील खालील प्रमाणे आहेत.
वाशिम जिल्ह्यातील प्रजिमा.२२ ते गिंभा कवठळ बोरव्हा खु. रोहना कोलार गिरोली विळेगाव शेंदुरजना अढाव रुई ते जिल्हा सिमा रस्त्याची सुधारणा करणे प्रजिमा.४१ किमी.२२/०० ते २८/०० ता. मानोरा जि. वाशिम या कामाकरिता अंदाजित किंमत ३२३.९४ लक्ष रुपये.
वाशिम जिल्ह्यातील वनोजा तरहाळा पोटी मोहरी खडी धामणी रस्त्याची सुधारणा करणे प्रजिमा.२२ किमी.४१/०० ते ४२/०० ता.मानोरा जि.वाशिम या कामाकरिता अंदाजित किंमत १५५.३३ लक्ष रुपये.
वाशिम जिल्ह्यातील मानोरा गव्हा रतनवाडी रस्त्याची सुधारणा करणे प्रजिमा.२० किमी.१७/०० ते १८/५०० ता. मानोरा जि.वाशिम या कामाकरिता अंदाजित किंमत ८०.०९ लक्ष रुपये.
वाशिम जिल्ह्यातील हातना हातोली आमदरी पाळोदी रणजीतनगर रुई गोस्ता ते मेंद्रा रस्त्याचे भुली गावात नालीसह सिमेंट कॉक्रीटीकरण करणे प्रजिमा.४३ किमी.२/०० ते ३/०० ता. मानोरा जि. वाशिम या कामाकरिता अंदाजित किंमत ३५०.०० लक्ष रुपये.
वाशिम जिल्ह्यातील प्र.रा.मा.१२ कारंजा अनई इंजा येवता मनभा रस्त्याची सुधारणा करणे प्रजिमा.३९ किमी.८/०० ते १३/०० ता. कारंजा जि. वाशिम या कामाकरिता अंदाजित किंमत ४००.०० लक्ष रुपये.
वाशिम जिल्ह्यातील हातना हातोली आमदारी पाळोदी रणजीतनगर रुई गोस्ता ते मेंद्रा रस्त्यावर किमी.५/५०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे प्रजिमा.४३ ता.मानोरा जि. वाशिम या कामाकरिता अंदाजित किंमत २४०.०० लक्ष रुपये.
वाशिम जिल्ह्यातील प्रजिमा.२२ ते गिंभा कवठळ बोरव्हा खु. रोहना कोलार गिरोली विळेगाव शेंदूरजना अढाव रुई ते जिल्हा सिमा रस्त्यावर किमी.३६/२०० मध्ये मोठ्या पुलाचे बांधकाम करणे प्रजिमा.४१ ता. मानोरा जि. वाशिम या कामाकरिता अंदाजित किंमत ८५४.९० लक्ष रुपये.
तालुका मानोरा जि.वाशिम येथे ६ मंडळ अधिकारी व तलाठी यांचे कार्यालय बांधकाम या कामाकरिता अंदाजित किंमत १५०.०० लक्ष रुपये.
वाशिम जिल्ह्यातील आमगव्हाण कोंडोली भोयणी रस्त्यावर किमी. २/५०० मध्ये अरुणावती नदीवर कोंडोली गावाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम करणे इ.जि.मा.७० ता.मानोरा या कामाकरिता अंदाजित किंमत ६६९.४५ लक्ष रुपये.
वाशिम जिल्ह्यातील वनोजा शेंदूरजना मोरे तऱ्हाळा, पोटी, मोहरी , धामनी, इंझोरी, म्हसनी, दिघी , सोमठाना ते राज्यमार्ग रस्त्याची सुधारणा करणे प्रजिमा.२२ किमी. ४२/०० ते ४३/४०० ता.कारंजा जि.वाशिम या कामाकरिता अंदाजित किंमत १००.०० लक्ष रुपये.
इत्यादी कामांना मंजुरात मिळाल्याचे संजय भेंडे भाजपा ता.प्रसिद्धी प्रमुख तथा आमदार राजेंद्र पाटणी यांचे स्वीय सहाय्यक यांनी महाराष्ट राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला कळविले असल्याचे आमचे जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे यांनी सांगीतले असून.कारंजा - मानोरा विधानसभा मतदार संघात ह्या विकास कामाचे आनंददायी वृत्त कळताच लोकप्रिय आमदार राजेंद्र पाटणी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....