सिरोंचा तालुका हा संरक्षित वनाने व्यापलेला तालुका आहे .दुर्गम भागातील काही शेतमजुर कित्येक वर्षा पासुन आणि कित्येक पीढी पासुन पारंपरिक वन जमीनी शेती करून आपला संसार पोसत आहे. हा शेतमजुर वन हक्क पठ्ठ्या पासून वंचित आहे. हा शेत मजुर ज्या अतिक्रमित वन जमिनीवर शेती वर च अवलंबून आहे ,त्याच जमिनीवर पिकलेल्या अन्न धान्य वरच त्याचा संसाराचा पोषण होतो. दुस-या बाजुला काही भुस्वामी आपल्या कुटुंबाच्या सदस्याच्या नावाने वन जमिनी अतिक्रमण करून वन हक्क अंतर्गत पट्टे मिळवले ,आणि पुन्हा त्याच वन जमिनीच्या बाजूलाच पुन्हा अतिक्रमण केलेले आहेत .वृक्षाना कापुन शेत जमीन बनविले आहे .पुन्हा कुटुंबाच्या दुस-या सदस्याच्या नावाने वन हक्क पठठयासाठी प्रयत्न चालु आहे .काही सरकारी नोकरदार सुध्दा कुटुंबाच्या सदस्यांच्या नावाने वन हक्क पठ्ठा मिळविले आणि पठ्या पेक्षा जास्त वन जमिन वर कब्जा केलेले आहेत .वन हक्क दावाच्या सरासर उल्लंघन केलेले आहेत. वन जमिने व राजस्व जमिनी अतिक्रमण करून खरेदी विक्री चा व्यवहार सुध्दा सुरु आहे .बरेचदा संबधीत विभागाने कर्मचारी सुध्दा जमिन वन ची आहे कि राजस्व ची संभ्रमात आहेत. वन जमिनीवर अतिक्रमण मुळे जंगली जानवारासाठी संरक्षित भाग सुध्दा हिरावलेला आहे .जंगली जनावरांची संख्या पण कमी झालेली आहे. वन विभागाचे कर्मचारी वन रक्षणासाठी प्रयत्न करित आहेत .पर्याप्त सुरक्षा ,ठोस योजना आणि उच्च स्तरिय वन संरक्षण उपायोजना च्या अभावी कर्मचारी सुध्दा हतलब झालेले आहेत .भारतीय वन अधिनियम, वन्य जीव संरक्षण अधिनियम, आणि लोक संपत्ती क्षति निवारण अधिनियमाचे सरासर उल्लंघन होत आहे.