कारंजा (लाड) : राज्याच्या विधानसभेच्या 2024 च्या सार्वत्रिक निवडणूकांकरीता बुधवारी दि.20 नोव्हेंबरला सर्वत्र मतदान पार पडले. तर दि.23 नोव्हेंबरला मतमोजणी पार पडली.या मतमोजणीत भाजपाच्या उमेदवार श्रीमती सईताई डहाके यांनी सर्वाधिक मताधिक्याने विजय संपादन करून कारंजा मानोरा विधानसभा निवडणूकीच्या इतिहासात सर्वाधिक मते घेऊन नव्या विक्रमाची नोंद नोंदवीली. या निवडणुकीत भाजपाच्या श्रीमती सईताई डहाके यांना 84 हजार 849 तर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाटणी यांना 50 हजार 631 मते मिळाली.त्यामुळे श्रीमती सईताई डहाके या 34 हजार 218 मतांनी विजयी झाल्या.यावेळी कारंजा मानोरा या विधानसभा मतदारसंघात 65.43 टक्के म्हणजेच 1 लाख 62 हजार 69 पुरुष,1 लाख 54 हजार 163 महिला व 9 इतर असे एकूण
3 लाख 16 हजार 241 मतदारांपैकी 1 लाख 86 हजार 17 पुरुष व 98 हजार 285 महिला आणि 5 इतर अशा एकूण 2 लाख 69 हजार 7 मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावून निवडणूक रिंगणातील 27 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मध्ये बंद केले होते. शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याने निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. कारंजा येथील मंगरूळपीर मार्गावरील शेतकरी निवास येथे शनिवारी सकाळी 8 : 00 वाजता पासून मतमोजणीला प्रारंभ झाला. 14 मतमोजणी व 10 पोस्टल टेबल अशी 24 टेबलवर 26 फेऱ्यात मतमोजणी करण्यात आली. 35 कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघात ज्ञायक राजेंद्र पाटणी, सईताई प्रकाश डहाके, सुनिल पाटील धाबेकर,किशोर पवार, रामकृष्ण सावके, प्रकाश इंगळे, देवश्री चव्हाण,
विजय वानखडे, प्रकाश आठवले, सिद्धार्थ देवरे, रामकृष्ण धाये, निलेश
राठोड, गजानन पवार, हंसराज शेंडे, गजानन अमदाबादकर, मनीष पवार, रमेश
नाखले, प्रमोद ठाकरे, ययाती नाईक, प्रदीपकुमार चव्हाण, वर्षा राठोड,
पुखराज घनमोडे, राजकुमार भुजाडले, संतोष दुर्गे, मोहम्मद युसुफ मोहम्मद पुंजानी व बापूसाहेब
साबळे या 27 उमेदवारांनी या निवडणुकीत आपले भाग्य अजमावले.मतमोजणीनंतर भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजयाचा गुलाल उधळून जल्लोष साजरा केला तर पराभूत उमेदवारांनी शांतपणे आपला पराजय स्विकारून आपल्या घरी जाणे पसंत केले. निवडणुकीत महाविकास आघाडीचे पाटणी यांना 50 हजार 631, वंचित बहुजन आघाडीचे सुनील धाबेकर यांना 23 हजार 359, एम.आय.एम. चे मोहम्मद युसुफ पुंजाणी यांना 31 हजार 17 आणि समनक जनता पार्टीचे ययाती नाईक यांना 7953 मते मिळाली.त्यामुळे एकंदरीत कारंजा मानोरा या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ही एकतर्फी झाली मतमोजणी दरम्यानचा अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाडवी व कारंजा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेशचंद्र शुक्ला यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच सुरक्षा जवानांच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवल्याचे दिसून आले.कारंजेकर नागरीकांनी विजयाचा जल्लोष आनंदोत्सव करीत साजरा केला.कारंजा येथील सर्वधर्मिय नागरीकांनी जातीय सलोखा कायम ठेवून श्रीमती सईताई डहाके आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल आपआपल्या गावात, मोहल्ल्यात,वार्डावार्डात फटाक्यांची अतिषबाजी करीत आणि एकमेकांना पेढे भरवीत, तसेच गुलाल उधळून आनंद व्यक्त केला.श्री.कामाक्षा देवी मंदिरासमोर महाजन कुटूंबीय, गोंधळी समाज,कडोळे परिवार, विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा, साप्ताहिक करंजमहात्म्य परिवार, महाराष्ट्र गोंधळी समाज संघटना, आई श्री कामाक्षा मित्र मंडळाकडून आनंद व्यक्त करण्यात आला. दिव्यांग जनसेवक संजय कडोळे, रोहित महाजन यांनी श्रीमती सईताई यांना भेटून त्यांचे हार्दिक अभिनंदन करतांना आद्यशक्ती श्री कामाक्षा देवीने स्थानिक महिला आमदार निवडून देण्याची कारंजेकराची आर्त हाक ऐकल्याचे म्हटले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....