कारंजा : कु.श्रेया दत्तात्रय खंडार हिने अतिशय गरिबीच्या परिस्थितीत आणि घरात शैक्षणिक वातावरणाचा वानवा असताना,स्वतःच्या मेहनतीने इयत्ता १० वीच्या शालांत परिक्षेत ९१. २०% गुण मिळवून आपल्या आई-वडिलांचे व घरच्या सर्व मार्गदर्शक आणि गुरुजनांचे नाव उज्वल केले आहे.श्रेया दत्तात्रय खंडार ही जे.डी. चवरे विद्या मंदिर कारंजाची विद्यार्थिनी असून,अ.भा.श्री.गुरुदेव सेवा मंडळाचे प्रसिद्धी प्रमुख कारंजा(लाड) जिल्हा वाशिम तसेच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र जिल्हा सचिव विजय बा.खंडार यांची पुतणी आहे. कु.श्रेयाच्या उज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष तथा डिजीटल मिडिया संपादक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी हार्दिक शुभेच्छा देत कौतुक केले आहे.