वाशिम : महाराष्ट्रातील जनमाणसांचा विश्वास संपादन करून येथील राजकारणावर मजबूत पकड निर्माण करून,भाजपाचे एकमेवाद्वितीय प्रभावी नेतृत्व म्हणून जनमाणसात सुप्रसिद्ध असलेल्या देवेन्द्र फडणवीस यांचे अव्वल सचिव असलेल्या अमोल पाटणकर यांनी वाशिम जिल्ह्यात चाणक्य नितीचा वापर करीता पक्षसंघटनाचे काम यशस्वीपणे पार पाडून जिल्ह्यातील वाशिम मंगरूळपीर आणि कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या दोन आमदारांना निवडून आणण्याकरीता जीवाचे रान करून महायुतीला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे विधानपरिषदेचे आमदार म्हणून त्यांची निवड करण्याची मागणी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजसेवक संजय कडोळे यांनी केली आहे.ना. देवेन्द्र फडणवीस यांचे अव्वल सचिव असलेल्या अमोल पाटणकर यांनी जिल्ह्यातील अनेक तालुक्याच्या मतदार संघामध्ये भाजपाची बांधणी करून आणि मतदारसंघातील व सोबतच कोणताही दुजाभाव न करता संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील अनेक ठिकाणची विकासाची कामे आपल्या कलाकौशल्याने मार्गस्थ लावून जिल्हयातील नागरिकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.अमोल पाटणकर हे मुळच्या कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातील,संत गजानन महाराजांचे परम शिष्य असलेल्या पितांबर महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या कोंडोली या खेडेगावातील रहीवाशी.परंतु अलिकडच्या काळात त्यांचा जिल्ह्यातील जनसंपर्क आणि जनसंवाद वाढवीला होता. त्यातूनच नागरिकांची गाऱ्हाणी ऐकून घेत नागरीकांच्या विविध समस्या सोडविण्यात ते दाखवीत असलेल्या हजरजवाबीपणा आणी कार्यकुशलतेमुळे आज प्रत्येकांना अमोल पाटणकर हे हवे हवेसे वाटतात.एवढे प्रेमाचे स्थान त्यांनी आपल्या विकास कामाच्या हातोटीने प्रत्येकाच्या हृदयात निर्माण केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकापूर्वी कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघातून उमेदवारी करीता त्यांचे नावही पुढे आले होते.परंतु त्यांनी भाजपा पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानीत उमेद्वारी मिळविण्याच्या भानगडीत न पडून पक्षांतर्गत स्पर्धा न वाढू देता,पक्षाने दिलेल्या उमेद्वाराला निवडून आणण्यावर लक्ष्य वेधले.आणि स्वतःच्या चाणक्य नितीने वाशिम विधानसभा मतदार संघाचे आमदार श्यामभाऊ खोडे आणि कारंजा विधानसभा मतदार संघाच्या पहिल्या महिला आमदार सईताई डहाके यांच्या निवडीसाठी अथक परिश्रम घेतले.त्यांना निवडूनही आणले.विधानसभा निवडणूकाही पार पडल्यात. आणि चालू आठवड्यात मुख्यमंत्री पदावर ना.देवेन्द्रजी फडणवीस विराजमान होऊन मंत्रीमंडळ स्थापन होण्याची शक्यता आहे.यानंतर लवकरच विधानपरिषदे मध्येही काही सदस्याच्या नियुक्तींची शक्यता आहे. म्हणूनच अमोल पाटणकर यांचाही आता विधानपरिषदेसाठी विचार होईल असी खात्री आहे. करीता जिल्हा निर्मितीपासून म्हणजेच अंदाजे पंचवीस तिस वर्षापासून विकासापासून वंचित ठरलेल्या आकांक्षित वाशिम जिल्ह्याच्या विकासाकरीता अमोल पाटणकर यांच्यासारख्या अनुभवी,अभ्यासू व कतृत्ववान व्यक्तीची वाशिम जिल्ह्यातून विधानपरिषदेत नियुक्ती करण्यात यावी.व जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष दूर होण्यासाठी हातभार लावावा.असी मागणी महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ समाजसेवक संजय कडोळे यांनी केली आहे.