भागवत कथा मोक्ष आणि पूर्वजांना तृप्त करणारी आनंददायी कथा असून ग्रामीण संस्कृतीमध्ये भागवताच्या माध्यमातून परिवाराच्या सुखदुःखाच्या गोष्टी अध्यात्म आणि भक्ती आणि एकमेकांच्या परिचय साठी आवश्यक असून आणि सामाजिक समरसतेसाठी भंडारा सामूहिक हा महत्त्वाचा असून गोरेगाव या परिसरातील संत गजानन महाराज भक्तांनी महाराजांना अभिप्रेत अन्नदान अध्यात्म भक्ती श्रद्धा विश्वास सामाजिक समरसता का परिचय कृतीने दिला आहे असे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनापासून गोरेगाव परिसरामध्ये गोरेगाव बु.येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे भागवत समाप्ती कार्यक्रमाला आ. रणधीरभाऊ सावरकर उपस्थित होते.
ह्या निमीत्ताने आ. रणधीर भाऊ सावरकर यांना संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या दर्शनाचा योग आला. व सोबतच वारकरी संप्रदायातील मान्यवरांच्या भेटीने आनंद द्विगुणित झाला. सोहळ्याच्या निमित्ताने मंदीर संस्थानचे वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
ह्यावेळी शंकरराव वाकोडे,अंबादास उमाळे,रवींद्र गावंडे,राजेश ठाकरे,संतोष पाटील वाकोडे,प्रदीप महाराज गावंडे,विठ्ठल चतरकार, किरण थोरात, ह.भ.प.उमेश महाराज भाकरे,रमेश पाटील पोलीस पाटील,संजय पाटील व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.