कारंजा : सततच्या पावसामुळे मानोरा तालुक्यात हाहाकार उडाला असून, तालुक्यातून वाहणाऱ्या अडाण नदीचे पाणी इंझोरी गावालगत शिरले असून, परिसरातील वाकी, वाघोळा, इंझोरी येथील शेतकर्याच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत तर अनेकांची पिके उध्वस्त होऊन सडण्याची भिती निर्माण झाली आहे.असे वृत्त इंझोरी येथील आमचे प्रतिनिधी डॉ कलिम मिर्झा यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेला दिल्याचे वृत्त अध्यक्ष संजय कडोळे यांनी कळवीले आहे.