कारंजा : सालाबादप्रमाणे यंदाही स्थानिक श्री संत गजानन महाराज संस्थान बायपास,ममतानगर येथे दि. ५ जून २०२५ रोजी श्रींना तब्बल ५.२५ क्विंटल आंब्याची आरास चढवण्यात येणार आहे. या उपक्रमात भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थानकडून करण्यात आल्याचे वृत्त आमचे प्रतिनिधी अंकुश मुंदे यांना मिळाल्याचे त्यांनी करंजमहात्म्य परिवाराला कळवीले आहे. याबाबत अधिक वृत्त असे की,स्थानिक बायपास, ममतानगर येथील श्री संत गजानन महाराजांचे सुंदर व प्रशस्त असे मंदिर असून,येथे श्री सेवा समितीतर्फे दरवर्षी श्रींना' ५.२५ क्विंटल आंब्याचा आरस व कानवल्याचा नैवेद्य चढविण्याचा कार्यक्रम घेण्यात येत असतो. सालाबादप्रमाणे यावर्षी देखील ५ जून रोजी गुरूवार या दिनाचे औचित्य साधून 'श्रीं'ना ५.२५ क्विंटल आंब्याचा आरास व
कानवल्याचा नैवेद्य चढविण्याचा मानस संस्थान व सेवा समितीने केला आहे. या उपक्रमात प्रत्येक भक्ताचा सहभाग असावा अशी संस्थानची संकल्पना असून , या अनुषंगाने एका श्रींच्या भक्तांनी, सेविका, सेवेकरी यांच्या कुटुंबाकडून १ किलो आंब्याचा सहभाग घेतला जाणार आहे. तरी इच्छुकांनी त्याकरिता आपल्या नावाची नोंदणी करावी असे आवाहन संस्थानच्या सेवा समितीतर्फे करण्यात आले आहे. असे वृत्त मिळाल्याचे संजय कडोळे यांनी सांगीतले.