अकोला:- येथील बिर्ला गेट जवळ राहत असलेल्या, पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या परंतु अकोला जिल्ह्यात गरजवंतांची "भगिनी" म्हणून सुपरिचित असलेल्या प्रत्येक गरजवंताला अडीअडचणीत मदतीसाठी नेहमी धावून जाणाऱ्या समाजसेविका म्हणजे कमलजीत कौर होत. मनाने हळव्या , भावनिक ,संवेदनशील परंतु कर्तुत्वाने दानशूर असलेल्या या महिलेमध्ये प्रचंड आत्मविश्वास व कोणतेही संकटावर मात करण्याची प्रवृत्ती. समाजामध्ये वावरताना अडल्या नडल्या गरजवंतांना मायेचा हात देऊ त्याला त्या दुःखातून बाहेर काढण्याकरता आपल्या परीने त्या नेहमी मदत करीत असतात. संकट मोचन म्हणून प्रत्येकाच्या संकटाला दूर करण्याचा प्रयत्न करीत असतात. दुसऱ्याचे संकट, दुःख म्हणजे आपले समजून त्यामधून मार्ग काढण्याकरता त्या सातत्याने प्रयत्न करीत असतात .कोणतेही जातीपातीचा, धर्माचा विचार न करता "मानवता" हा आपला धर्म समजून कोणत्याही मानवावर आलेल्या संकटाला मात करण्याकरता आपल्या परीने मदत करण्याचे काम कमलजीत कौर सातत्याने कित्येक वर्षापासून करीत आहेत. प्रसिद्धीपासून दूर राहत असलेल्या परंतु गरजवंतांपर्यंत नेहमी पोचून त्याला मदत करण्याचे काम त्या सातत्याने अकोला जिल्ह्यामध्ये करीत आहे. दुःखीताची सेवा हीच ईश्वर सेवा समजून त्या सातत्याने गरजवंताला मदत करीत असतात. कोणाला शिक्षणासाठी, कोणाला आरोग्यासाठी, तर कोणाला जीवन जगण्यासाठी सातत्याने त्या गरजवंतापर्यंत स्वतः पोचून त्याला मदत करण्याचे कार्य करीत आहेत. कोणाला बहीण म्हणून ,कोणाला आई म्हणून, कोणाला मुलगी म्हणून, कोणान कोण्या नात्याने वंचित ,गरजवंत व्यक्तीला शोधून त्याला त्या संकटातून बाहेर काढण्याचे काम त्या सातत्याने करीत आलेला आहे. कोणताही प्रकारचा गर्व नाही. कोणते प्रकारचा अभिमान नाही, प्रसिद्धीची लालसा नाही, मोठेपणात रमत नाहीत, त्यांना आस असते ती गरजवंताच्या मदतीला धावून जाण्याची त्याला त्या संकटातून बाहेर काढण्याची ,त्याला त्याच्या पायावर उभा करण्याची. अशा अनेक दुःखीताचा गरजवंतांच्या कामात आलेल्या ताईने अनेकांचे दुःखाचे अश्रू पुसून त्याच्या जीवनामध्ये आनंद, सुख , समाधान हास्य आणलेला आहे. मानवता आपला धर्म समजून मानवाला ईश्वर समजून त्याची पूजा करणाऱ्या, त्याचे अडी अडचणीत मदत करणाऱ्या कमलजीत कौर या खऱ्या अर्थाने समाजसेविका असून त्या आपल्या हातून अनेक दुःखीताची सेवाकार्य सेवाभाव वृत्तीने निस्वार्थपणे सातत्याने करीत आहेत. कोणतेही प्रकारचा गर्व नाही. कोणतेही कोणाकडूनही अपेक्षा नाही परंतु सातत्याने दुसऱ्याच्या दुःखात धावून जाऊन मदत करणाऱ्या समाजसेविका म्हणून त्यांनी ख्याती मिळवलेली आहे. स्वतः सोबतच स्वतःच्या मुलाला सुद्धा समाजसेवेचे बाळकडू लहानपणापासूनच देत असून त्याला सुद्धा एक चांगला माणूस समाजसेवक घडवण्याचे कार्य ते सातत्याने करीत आहेत. अशा या गरजवंतांच्या बहिण समाजसेविका कमलजीत कौर. या माणसाच्या या गर्दीत ,अनेक चेहरे भेटतात, काही चांगले, काही वाईट ,काही कधीच लक्षात न राहणारे आणि काही कायमचे मनातच घर करणारे. मनात घर करणारी जी अनेक माणसं जगताना लाभली त्यातलेच एक तुम्ही........... व्यक्तिमत्व आपका, शान है हमारी, कर्तुत्व आपका, पहचान है हमारी. हिफाजत करना है जिंदगी की ,क्यूकी सासे आपकी जान है हमारी.... आपल्यासारख्या समाजसेवी दानशूर व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा. गजानन हरणे ,समाजसेवक तथा संयोजक ,निर्भय बनो जनआंदोलन..,..........!