गडचिरोली :-
सहकारी पतसंस्था क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजल्या जाणाऱ्या "बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार 2023" साठी दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोलीची सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे. सदर पुरस्कार 14 फेब्रुवारी 2024 रोजी दमन (दमन आणि दीव) येथे सहकारी पतसंस्थांसाठी आयोजित "बँको सहकार परिषद 2024" मध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
सहकार क्षेत्राला बळकटी मिळावी तसेच प्रामाणिक आणि चोक काम बजावणाऱ्या, सहकारी कायदे आणि नियमांची चौकट सांभाळून प्रगती साधणाऱ्या पतसंस्थांना" बँको पतसंस्था ब्लू रिबन" पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. ज्या नागरी सहकारी पतसंस्थांच्या ठेवी 100 कोटी ते १२० कोटीपर्यंत आहे अशाच पतसंस्थांना या पुरस्कारासाठी भाग घेता येतो, यासाठी महाराष्ट्रातील विविध पतसंस्थांकडून ठरवलेल्या मापदंडानुसार प्रस्ताव मागितले जातात , या प्रस्तावांचे परीक्षण करून तज्ञ परीक्षण समितीने दिलेल्या अहवालानुसार स्पर्धेतील पतसंस्थेची ब्ल्यू रिबन पुरस्कारासाठी निवड केल्या जाते. दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेने 110 कोटीचा ठेवीचा टप्पा गाठला आहे. संस्थेचे गुंतवणूक 55 कोटी रुपयाची असून 89 कोटी रुपयाचे कर्ज वाटप केले आहे. भाग रक्कम 3.24 कोटी रुपये एवढी असून राखीव व इतर निधी 20 कोटी रुपये आहे. गडचिरोली सारख्या आदिवासी नक्षलग्रस्त भागात आर्थिक दृष्ट्या भक्कम, ठेवींना संपूर्ण संरक्षण, ग्राहकांचा प्रचंड विश्वास आणि सहकार खात्याच्या प्रत्येक निकषात तंतोतंत बसणारी " दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोली" ही सहकार क्षेत्रातील विश्वसनीय पतसंस्था म्हणून ओळखली जाते. या पतसंस्थेची सलग दुसऱ्यांदा " बँको ब्ल्यू रिबन पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री , उपाध्यक्ष सुमतीताई मुनघाटे, मानद सचिव सुलोचना वाघरे, संचालक पंडित पुडके, प्रा. मधुकर कोटगले , पवन मुनघाटे , दिलीप उरकुडे, शेषराव येलेकर, मुकुंद म्हशाखेत्री , दिलीप खेवले, किशोर मडावी, कृष्णा दुधे, संध्या खेवले , पांडुरंग चिलबुले, व्यवस्थापक लिंगाजी मोरांडे ,भूषण रोहनकर सर्व शाखा व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.
या पतसंस्थेच्या गडचिरोली, जिल्हा कॉम्प्लेक्स, चामोर्शी ,आष्टी, आलापल्ली, अहेरी , धानोरा, आरमोरी, कुरखेडा अशा ९ शाखा असून या शाखांशी जूडलेले सर्व सभासद, ग्राहक, ठेवीदार , हितचिंतक, ठेव अभिकर्ता, शाखा व्यवस्थापक, सर्व कर्मचारी व संचालक मंडळातील सर्व सदस्य यांच्या परस्पर सहकार्यामुळेच हे यश गाठता आल्याचे संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री यांनी सांगितले आहे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....